education esakal
देश

देशातील १५ कोटी मुले शिक्षण व्यवस्थेबाहेरच

२५ कोटी एवढी लोकसंख्या ही साक्षरतेच्या प्राथमिक चौकटीमध्ये देखील येत नाही.

सकाळ वृत्तसेवा

(पीटीआय) : ‘‘देशभरातील किमान पंधरा कोटी मुले (children)आणि तरुण हे औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर असून २५ कोटी एवढी लोकसंख्या (population) ही साक्षरतेच्या प्राथमिक चौकटीमध्ये देखील येत नाही.’’ असे धक्कादायक वक्तव्य केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’कडून (सीआयआय) आयोजित ‘रोजगार निर्मिती आणि उद्यमशीलता’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

‘‘देशातील साधारणपणे ३ ते २२ वर्षे वयोगटातील विविध शैक्षणिक संस्थांमधील (Education Institution)लहान मुले आणि तरुणांचा (youth)विचार केला तर त्यांची एकत्रित संख्या ३५ कोटी एवढी भरते पण देशातील एकूण लोकसंख्येचा विचार केला हा आकडा ५० कोटींच्या घरामध्ये जातो.’’ असे प्रधान यांनी नमूद केले. देशाला स्वातंत्र्य (freedom) मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या जनगणनेनुसार १९ टक्के लोकसंख्या ही निरक्षर होती. आता ७५ वर्षांनंतर साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोचले आहे, याचाच अर्थ आणखी २० टक्के लोक (साधारणपणे २५ कोटी) प्राथमिक साक्षरतेच्या चौकटीमध्ये येत नाहीत, असेही प्रधान यांनी नमूद केले.

हा २५ वर्षांच्या वाटचालीचा आराखडा आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध तरतुदींचा उल्लेख करताना प्रधान म्हणाले, की हा केवळ दस्तावेज नाही तर तो पुढील २५ वर्षांच्या वाटचालीचा आराखडा आहे. देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्याला काही निश्‍चित ध्येये गाठायची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT