karnataka
karnataka 
देश

'त्या' 15 आमदारांना भाजपकडून उमेदवारी

वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकातील अपात्र आमदारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेचा आदेश उचलून धरत न्यायालयाने सर्व अपात्र आमदारांना निवडणूक लढविण्यास मात्र पात्र ठरविले होते. अखेर या सर्व 17 अपात्र आमदारांपैकी 15 उमेदवारांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

कर्नाटकात पाच डिसेंबरला होणारी या 15 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. बुधवारी अपात्र आमदारप्रकरणी समतोल निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला होता. बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगत, विधानसभेचा कालावधी संपेपर्यंत कोणतीच निवडणूक लढवता येणार नाही, अशी घातलेली अट मात्र न्यायालयाने शिथिल केली होती. त्यामुळे या निकालातून कुणाचीच निराशा झालेली नव्हती. पाच डिसेंबर रोजी होणारी विधानसभेची पोटनिवडणूक अपात्र आमदार लढवू शकतील, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेचा आदेश न्यायालयाने उचलून धरल्यामुळे अपात्र आमदार पोटनिवडणुकीत निवडून येईपर्यंत मंत्रिपद किंवा अन्य कोणतेच घटनात्मक पद स्वीकारू शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारविरुद्ध असमाधान व्यक्त करून काँग्रेसच्या 13, जेडीएसच्या तीन व केपीजेपी पक्षाच्या एका आमदाराने राजीनामा दिला होता. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून तत्कालीन विधानसभाध्यक्ष रमेशकुमार यांनी त्यांना अपात्र ठरविले होते. परंतु आज या 17 अपात्र आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश यापैकी 15 आमदारांना भाजपने उमेदवारीही जाहीर केली आहे. 

कोण आहेत हे आमदार : 
एम. टी. बी. नागराज (होसकोटे), डॉ. के. सुधाकर (चिक्कबळ्ळापूर), नारायणगौडा (केआर पेठ), एच. विश्वनाथ (हुनसूर), के. गोपाल (महालक्ष्मी ले-आउट), मुनिरत्न (राजराजेश्वरीनगर), एस. टी. सोमशेखर (यशवंतपूर), रोशन बेग (शिवाजीनगर), भैरती बसवराज (केआरपूरम), बी. सी. पाटील (हिरेकेरुर), महेश कुमठळ्ळी (अथणी), आर. शंकर (राणेबेन्नूर), श्रीमंत पाटील (कागवाड), रमेश जारकीहोळी (गोकाक), आनंदसिंग (विजयनगर), प्रतापगौडा पाटील (मस्की), शिवराम हेब्बार (यल्लापूर). 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT