Surname Patil Karnataka Election esakal
देश

Karnataka Election : विधानसभेत दिसणार 'पाटीलकी'; निवडणुकीत तब्बल 'इतक्या' पाटलांनी मिळवला विजय

विधानसभा निवडणुकीमध्ये 'पाटील' आडनाव असलेल्या ८७ मातब्बर उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

राजेंद्र हजारे

पाटील हे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि अगदी आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आडनाव आहे.

निपाणी : विधानसभा निवडणुकीमध्ये 'पाटील' आडनाव असलेल्या ८७ मातब्बर उमेदवारांनी आपले नशीब आजमावले, त्यापैकी आमदार म्हणून २० जण निवडून येऊन विधानसभेत प्रवेश केला आहे. त्यामुळं पाटलांचा करिष्मा अजूनही राजकारणात दिसत आहे.

पाटील हे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि अगदी आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आडनाव आहे. महाराष्ट्र, गोवा आणि आंध्रप्रदेशात पाटील हे गावचे नेते राहिले आहेत. उत्तर कर्नाटकात त्यांना प्रेमाने 'गौड्र' असे संबोधले जाते. यावेळी विधानसभा निवडणुकीत पाटील आडनावाच्या ८७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी २० विजयी झाले.

त्यामध्ये १२ काँग्रेसचे, ७ भाजपचे आणि एक धजदच्या उमेदवाराचा समावेश आहे. हम्पी येथील कन्नड विद्यापीठाचे कथाकार आणि निवृत्त प्राध्यापक अमरेश नुगाडोनी यांनी नमूद केले की 'पाटील' हे ब्रिटिश, पेशवे आणि निजाम यांनी गावांची देखरेख करण्यासाठी स्थानिक नेत्यांना दिलेले पद होते. सामान्यता पाटील हे लिंगायत असतात. आम्हाला पाटील आडनाव आढळल्याने अपवाद आहेत.

ब्राह्मण, कुरुबा आणि मराठा समाजातही पाटील आडनावाचे आहेत. पाटील हे आडनाव उच्चवर्णीयांना दिलेले होते. आर्थिकदृष्ट्या ते बऱ्यापैकी संपन्न होते. इंग्रज, पेशवे आणि निजाम हे गावातील नेत्यांना 'इनाम' आणि 'जहागीर' देत असत. त्यामुळे 'इनामदार' आणि 'जहागीरदार' आडनाव पाटलांच्या समांतर म्हणून पाहिले जात होते. पंचायतींचा कारभार पाहणाऱ्यानाही पाटील हे आडनाव असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

कुटुंबाला २०० वर्षांचा इतिहास असल्याचा दावा करणारे रोनचे काँग्रेसचे चार वेळा आमदार असलेले जी.एस. पाटील म्हणाले, आमच्या पूर्वजांना 'पोलीस पाटील' म्हणत आणि ते गावाची काळजी घेत होते. जेव्हा 'पोली सपाटील' स्वातंत्र्यानंतर पद रद्द करण्यात आले. आम्ही 'पोलीस' हा शब्द काढून टाकला आणि आमचे आडनाव 'पाटील' असेच ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

असे आहेत निवडून आलेले 'पाटील'

  • उमेदवार पक्ष मतदार संघ

  • अभय पाटील भाजप बेळगाव दक्षिण

  • बाबासाहेब पाटील काँग्रेस कित्तूर

  • जे. टी. पाटील काँग्रेस बिळगी

  • शिवानंद पाटील काँग्रेस बसवन बागेवाडी

  • एम. बी. पाटील काँग्रेस बबलेश्वर

  • बसनगौडा पाटील भाजपा विजयपूर शहर

  • यशवंतरायगौड पाटील काँग्रेस इंडी

  • एम.वाय. पाटील काँग्रेस अफजलपूर

  • चन्नारेड्डी पाटील काँग्रेस यादगीर

  • शरणप्रकाश पाटील काँग्रेस सेदम

  • अल्लमप्रभू पाटील काँग्रेस गुलबर्गा दक्षिण

  • सिद्धू पाटील भाजपा हुमनाबाद

  • शिवराज पाटील भाजप रायचूर

  • दोड्दनगौडा पाटील भाजप कुष्टगी

  • एच. के. पाटील काँग्रेस ‌ गदग

  • जी. एस. पाटील काँग्रेस रोन

  • सी.सी. पाटील भाजप नरगुंद

  • एम. आर. पाटील भाजप कुंदगोळ

  • व्ही. एस. पाटील काँग्रेस यल्लापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT