rakesh tikait File Photo
देश

संसदेजवळ 200 शेतकऱ्यांसह होणार आंदोलन; टिकैत यांचा इशारा

कार्तिक पुजारी

22 जुलैपासून 200 शेतकरी संसदेजवळ आंदोलन करतील, अशी माहिती भारतीय किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 200 लोक संसदेच्या आवारात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे

नवी दिल्ली- 22 जुलैपासून 200 शेतकरी संसदेजवळ आंदोलन करतील, अशी माहिती भारतीय किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 200 लोक संसदेच्या आवारात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे लागू केले आहेत. यापार्श्वभूमीवर जवळपास गेल्या 8 महिन्यांपासून देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. (200 people will hold protests near Parliament from July 22 BKU rakesh Tikait)

राकेश टिकैत एएनआयला बोलताना म्हणाले की, कृषी कायद्यांवर केंद्र सरकारला चर्चा करायची असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण चर्चा झाली नाही किंवा योग्य ते निकाल निघाले नाहीत तर 22 जुलैपासून 200 लोक संसदेजवळ आंदोलन करतील. टिकैत मंगळवारी म्हणाले की, शेतकरी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहे. पण, चर्चा कोणत्याही अटीशर्तींशिवाय व्हायला हवी.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले होते की, केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी तयार आहे. यानंतर राकेश टिकैत यांनी चर्चची तयारी दाखवली आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या घटनेबाबत बोलताना टिकैत म्हणाले की, कृषी कायद्याचा मुद्दा आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे घेऊन जाऊ , असं म्हटलेल नाही. 26 जानेवारीला झालेल्या घटनांबाबत आम्ही याआधी उत्तर दिलं आहे.

प्रजासत्ताक दिनादिवशी आंदोलनकर्त्यांनी निर्धारित मार्गाचा वापर केला नाही. त्यांनी बॅरिकेट तोडले आणि दिल्लीमध्ये घुसले. पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांचा संघर्ष झाला. राजधानीतील अनेक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि धार्मिक झेंडा लाल किल्ल्यावर फडकावण्यात आला. दरम्यान, 26 नोव्हेंबर पासून शेतकरी देशातील विविध भागात आंदोलन करत आहेत. त्यांनी केंद्राने आणलेल्या तीन कायद्यांना विरोध केला आहे. हे काळे कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण, केंद्र सरकारकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मी सोनं कमी खरेदी करण्यास सांगितलं, लोकांनी ऐकलं अन् भाव घसरले’; PM मोदींचं मोठं विधान

LPG Connections: देशातल्या 75 लाख कुटुंबांचं गॅस कनेक्शन कापलं; दोन प्रमुख कारणं आली समोर...

India Tiger Deaths 2026 : चिंताजनक! देशात वाघांच्या मृत्यूची संख्या दीडशेच्या पार; मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ टक्के व्याघ्रमृत्यू

Latest Marathi News Live Update: अखिल भारतीय पोलिस बँड स्पर्धेत महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक कांस्य

All India Police Band Competition : अखिल भारतीय पोलिस बँड स्पर्धेत महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक कांस्य; महिला पाइप बँड पथकाला ‘सर्वोत्कृष्ट संचालक’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT