Maharashtra Police esakal
देश

Maharashtra Police : दोन हजाराच्या नोटा बदलून देण्याच्या आमिषानं फसवणूक; पोलिस हवालदारासह तिघांना अटक

समीर भोसले यांनी पाचशे रुपयांच्या पाच लाख रुपये नोटा त्यांच्या हवाली केले.

सकाळ डिजिटल टीम

तासगाव पोलीस (Tasgaon Police) ठाण्यातील पोलीस म्हणून कार्यरत असलेला एकजण व अन्य दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

शिरगुप्पी, कागवाड : दोन हजाराच्या नोटा बदलून ५०० रुपयांच्या नोटा देण्याचे आमीष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मिरज येथील पोलिस हवालदारासह (Police Constable) तिघांना कागवाड पोलिसांनी (Kagwad Police) अटक केली.

याबाबत माहिती अशी, महाराष्ट्रातील समीर भोसले यांना टोळीतील दोन हजाराच्या नोटा बदलून देतो, असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. मंगसुळी येथील मल्लय्या देवस्थानाच्या परिसरात समीर भोसले यांना नोटा घेऊन येण्यास टोळीप्रमुखांने सांगितले.

बुधवारी (ता. ३१) समीर भोसले यांनी सायंकाळी तेथे गेले असता टोळीने त्यांना ‘तुमच्या नोटा द्या, आम्ही आमच्या देतो’, असे सांगितले. त्यानुसार समीर भोसले यांनी पाचशे रुपयांच्या पाच लाख रुपये नोटा त्यांच्या हवाली केले. मात्र, त्यांना देण्यात येणारे २००० च्या नोटा देताना त्यांना फसवून पोलीस आले पोलीस आले असे सांगून तेथून धूम ठोकले. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य पोलीस दलात (Maharashtra Police) सेवा बजावत असणारा पोलीसही सामील होता.

आपण पूर्णपणे फसलो गेलो आहे, असे त्यांना खात्री झाल्याने त्याच दिवशी सायंकाळी कागवाड पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार कागवाड पोलीस स्थानकाचे फौजदार हनुमंत नरळी, सीपीआय रवींद्र नाईकवाडी यांनी गुन्ह्याची नोंद करून तपास केला असता याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस दलातील तासगाव पोलीस (Tasgaon Police) ठाण्यातील पोलीस म्हणून कार्यरत असलेला एकजण व अन्य दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT