heat
heat sakal
देश

Hottest Year : 1901 नंतरचं पाचवं सर्वात गरम वर्ष 2021

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : 2021 हे वर्ष 1901 नंतरचे भारतातील पाचवे सर्वात उष्ण वर्ष होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी दिली आहे. देशात सरासरी वार्षिक हवेचे तापमान 0.44 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेल्याचेदेखील हवामान विभागाने म्हटले आहे. वर्षभरात पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, भूस्खलन, वीज पडणे यासारख्या घटनांमुळे देशात 1,750 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1901 नंतर 2021 हे वर्ष 2016, 2009, 2017 आणि 2010 नंतरचे देशातील पाचवे सर्वात उष्ण वर्ष नोंदविण्यात आले आहे, असे हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. (IMD RELEASED THE ANNUAL CLIMATE STATEMENT)

हिवाळा (जानेवारी ते फेब्रुवारी) आणि पावसाळ्यानंतरचे (ऑक्टोबर ते डिसेंबर) संपूर्ण भारतातील सरासरी तापमानातील विसंगती अनुक्रमे 0.78 डिग्री सेल्सिअस आणि 0.42 डिग्री सेल्सिअसने 2021 मध्ये तापमानवाढीस हातभार लावल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 2016 मध्ये , देशातील सरासरी वार्षिक हवेचे तापमान सामान्यपेक्षा 0.710 अंश सेल्सिअस जास्त होते. ते 2009 आणि 2017 च्या सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे 0.550 °C आणि 0.541 °C जास्त होते. तर, 2010 मध्ये सरासरी वार्षिक हवेचे तापमान सामान्यपेक्षा 0.539 °C जास्त होते. (2021 Is Found To Be The 5Th Warmest Year)

भारतात 2021 मध्ये वादळ आणि वीज (Lightning) पडून 787 लोकांचा मृत्यू (Death) झाल्याची नोंद झाली आहे, तर अतिवृष्टी (Flood) आणि पुरामुळे 759 लोक मरण पावले आहेत, असे हवामान (IMD) खात्याच्या निवेदनात म्हटले आहे. चक्रवाती तूफानामुळे 172 जणांचा मृत्यू झाला असून हवामाना संबंधित इतर घटनांमुळे 32 अन्य लोकांचा मृत्यू झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या सगळ्यमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 350 मृत्यू नोंदविण्यात आले आहेत, त्यानंतर ओडिशामध्ये 223 आणि मध्य प्रदेश मध्ये 191 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT