Rain  Sakal
देश

Whether Forecast : यंदा मॉन्सून सामान्य राहणार; स्कायमेटचा अंदाज

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : या वर्षीच्या मॉन्सून अंदाजाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी देशात मॉन्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खासगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने (Skymet) एजन्सीने 2022 साठी प्राथमिक मॉन्सून अंदाज जारी केले आहे. त्यानुसार यंदा मॉन्सून सामान्य राहणार असून 2022 मध्ये मॉन्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.( Skymet Released Pre Forecast For 2022)

स्कायमेट्सच्या पूर्वानुमानानुसार सुरुवातीच्या काळात मॉन्सूनची स्थिती चांगली असेल. तसेच या काळात भरपूर पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर हा हंगामी काळ शेतकऱ्यांसाठी अनुकूल राहील असे सांगण्यात आले आहे. एजन्सीचे उपाध्यक्ष आणि मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. पलावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पाहायला मिळेल. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मध्यात कमी पाऊस पडू शकतो, परंतु मॉन्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे, असे पलावत म्हणाले. 2021 मध्येही मॉन्सून सामान्य राहील असा अंदाज सांगण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून मॉन्सूनबाबतचा सविस्तर अंदाज सांगितला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT