Mucormycosis Sakal
देश

बुरशीसाठी केंद्राकडून विविध राज्यांना २३ हजारांची खेप रवाना

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मागील तीन ते चार दिवसांमध्येच देशभरातील रुग्णांची संख्या ९ हजारांवर पोचली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाच्या संसर्गाची (Corona Infection) दुसरी लाट (Second Wave) अद्याप पूर्णपणे ओसरली नसताना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराने डोकेवर काढल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. (23000 Consignment Sent to Various States Center for Black Fungus)

या आजाराचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मागील तीन ते चार दिवसांमध्येच देशभरातील रुग्णांची संख्या ९ हजारांवर पोचली आहे. या आजारावरील उपचारासाठी ‘ॲम्फोटेरेसिन- बी’ या औषधाचा वापर केला जातो. या औषधाचे २३ हजार ६८० डोस राज्यांना पाठविण्यात आले आहेत. तत्पूर्वी या आजाराची तीव्रता पाहून त्याला साथरोग म्हणून घोषित करण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली होती.

महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये काळ्या बुरशीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले आहेत. याशिवाय देशातील किमान ८ ते १० मोठ्या राज्यांमध्ये या रोगाने हात-पाय पसरल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक म्हणजे २ हजार २८१ रुग्णसंख्या असलेल्या गुजरातमध्ये तर यासाठी वेगळे वॉर्ड तयार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्याही २ हजारांवर गेली आहे

विविध राज्यांमधील रुग्ण संख्या लक्षात घेऊन या औषधांचे वाटप करण्यात आले आहे . नजीकच्या काळातही केंद्राकडून अशीच मदत राज्यांना पाठविण्यात येईल.

- डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय रसायने आणि खते मंत्री

ही लक्षणे असतील तर सावध व्हा

नाका-डोळ्यातून रक्त येणे, तीव्र डोकेदुखी, नाकातून काळा द्रव बाहेर पडणे, डोळे उघडझाप करण्यास वेदना होणे, दात दुखणे, उलट्या होणे, उलटीतून रक्त पडणे आणि चावण्यास त्रास होणे ही ब्लॅक फंगसची सुरवातीची लक्षणे मानली जातात ही लक्षणे उद्भवल्यास तातडीने कान, नाक, घसा यांच्या तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

सोनियांचे मोदींना पत्र

काळ्या बुरशीच्या आजारावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना आज पत्र पाठवून या रोगावरील औषधांच्या टंचाईबाबत सवाल केला. या आजारावरील उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशभर या आजाराने थैमान घातले असताना औषधांची टंचाई जाणवत असल्याच्या बातम्याबद्दल सोनिया गांधींनी चिंता व्यक्त केली. तसेच रुग्णांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची मागणीही त्यांनी केली.

वाढते रुग्ण

  • गुजरात - २,२८१

  • महाराष्ट्र - १,५००

  • आंध्रप्रदेश - ९१०

  • मध्यप्रदेश - ७२०

  • राजस्थान - ७००

  • तेलंगण - ३५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT