3 reasons and chronology of Rahul Gandhi Loksabha Membership Canceled
3 reasons and chronology of Rahul Gandhi Loksabha Membership Canceled  
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींची खासदारकी जाण्याची 3 कारणं अन् क्रोनोलॉजी; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

लोकसभेचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आज दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रह करणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधींची खासदारकी जाण्याची 3 कारणं अन् क्रोनोलॉजी सांगितली आहे. जयराम रमेश पत्रकार परिषदेत बोलत होते. (3 reasons and chronology of Rahul Gandhi Loksabha Membership Canceled )

सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, झालेल्या पत्रकाल परिषदेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

काय म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते?

राहुल गांधींची खासदारकी रद्द होण्याती तीन कारणं आहेत. एक म्हणजे, राहुल गांधींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवला. दुसरं, भारत जोडो यात्रेच्या यशामुळे भाजप घाबरलीय आणि तीसरं, राहुल गांधी अदानींच्या घोटाळ्यावर सातत्यानं बोलत आहेत.

तर क्रोनोलॉजी काय...

7 फेब्रुवारी - राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर लोकसभेत भाषण दिलं, 16 फेब्रुवारी - तक्रारदार गुजरात हायकोर्टात स्व:च स्थगिती मागे घेतो, 27 फेब्रुवारी - सुनावणी सुरू, 17 मार्च - निर्णय राखीव, 23 मार्च - निर्णय जाहीर होतो.

प्रकरण २०१९ चं....

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं २०१९ चं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी म्हणजेच सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं.

दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र त्यांची खासदारकी गेली. लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

SCROLL FOR NEXT