Sambra Airport Belgaum esakal
देश

विमानतळाच्यात इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! सांबरा विमानतळावरून तब्बल 'इतक्या' प्रवाशांचा विक्रमी प्रवास

बेळगाव विमानतळावरून (Belgaum Airport) मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या आकड्यानुसार डिसेंबर महिन्यात ५९१ उड्डाणे चालवण्यात आल्याचेदेखील आकडेवारीत समोर आले आहे.

बेळगाव : बेळगाव विमानतळावरून (Belgaum Airport) मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक वाढली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये बेळगाव विमानतळावर एकूण ३५,२३२ प्रवाशांचे स्वागत झाले. विमानतळाच्यात इतिहासात पहिल्यांदाच इतक्या प्रवाशांची ये-जा झाली आहे. यामुळे बेळगाव देखील राज्यात व्यस्त विमानतळ झाले आहे.

बेळगाव विमानतळाची प्रगती दिवसेंदिवस वाढतच असून प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India) अलीकडेच बेळगाव विमानतळाची मोठी प्रगती दर्शविणारी काही नवीन आकडेवारी दिली आहे. गेल्यावर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीत तब्बल ७१% वाढ झाली आहे.

विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या आकड्यानुसार डिसेंबर महिन्यात ५९१ उड्डाणे चालवण्यात आल्याचेदेखील आकडेवारीत समोर आले आहे. सुमारे २ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली आहे. त्यामुळे या विमानतळावरून केवळ प्रवासी नव्हेत, तर मालाचीही (कार्गो सेवा) वाहतूक होत आहे.

डिसेंबर २०२३ (एप्रिल ते डिसेंबर) पर्यंत बेळगाव विमानतळावरून तब्बल २,२३,०१३ प्रवाशांनी उड्डाण केले आहे. बेळगाव विमानतळ दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, सुरत, जोधपूर, जयपूर आणि अगदी तिरुपतीशी जोडलेले आहे. स्टार एअर बेळगाव ते अहमदाबादमार्गे अहमदाबाद, जोधपूर, मुंबई, सुरत, तिरुपती, नागपूर, जयपूर आणि भुजसह प्रमुख भारतीय शहरांसाठी थेट उड्डाणे देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT