Bihar_Election_2020
Bihar_Election_2020 
देश

Bihar Election 2020 : भल्याभल्यांना टक्कर देताहेत 'या' चार महिला उमेदवार!

सकाळ डिजिटल टीम

Bihar Election 2020 : यंदा बिहार निवडणुकीत नेत्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलींनीही मैदान गाजवण्यास सुरवात केली आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाच्या मैदानात आधी मुलांना संधी देणाऱ्या नेत्यांनी यंदा मात्र मुलींना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह, जेडीयूचे दिनेश सिंह आणि विनोद चौधरी यांच्या मुली निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. 

या निवडणुकीत पटनाच्या बंकीपूर मतदारसंघातून पुष्पम प्रिया चौधरी, तारापूर विधानसभा मतदारसंघातून दिव्या प्रकाश, गायघाट मतदारसंघातून कोमल सिंह आणि जमुई मतदारसंघातून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नेत्यांच्या या मुलींकडे संपूर्ण बिहारची नजर आहे.

कोमल सिंहचे वडील नितीश यांचे निकटवर्ती तर आई एलजेपीची खासदार
एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या कोमल सिंह गायघाट मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत. २७ वर्षीय कोमल जेडीयूच्या महेश्वर यादव यांना टक्कर देणार आहे.  कोमलचे वडील दिनेश सिंह हे नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात, पण त्यांनी आपल्या मुलीसाठी अजूनपर्यंत प्रचार सुरू केला नाही. तर आई वीणा देवी या एलजेपीच्या खासदार आहेत. वीणा देवी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीच्या रघुवंश प्रसाद सिंह यांना पराभूत केले होते. 

श्रेयसी सिंह जमुईमध्ये कमळ फुलवणार?
बिहारच्या राजकारणातील दिग्गज दिवंगत नेते दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह राजकीय वातावरणातच लहानाची मोठी झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी २९ वर्षीय श्रेयसी जमुई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. २८ ऑक्टोबरला जमुईमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. श्रेयसीचे वडील आणि आई पुतुल देवी दोघेही खासदार राहिले आहेत. श्रेयसी अपक्ष उमेदवार अजय प्रताप सिंह आणि आरजेडीच्या विजय प्रकाश यांना आव्हान देत आहे. 

दिव्या प्रकाशही निवडणुकीच्या रिंगणात
माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव यांची मुलगी दिव्या प्रकाश या निवडणुकीत पहिल्यांदाच तारापूर विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहे. २८ वर्षीय दिव्या विवाहित असून आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. दिव्याची एक बहीण सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. तारापूर विधानसभा मतदारसंघातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दिव्या जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांना टक्कर देत आहे.

पुष्पमच्या एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ
जेडीयू नेते आणि विधान परिषदेचे सदस्य विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरीच्या राजकारणातील एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मूळच्या दरभंगा येथील असलेल्या पुष्पमने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. पुष्पम प्लूरल्स पार्टीची संस्थापक अध्यक्ष आहे. बांकीपूरमधून निवडणूक लढवणाऱ्या पुष्पमपुढे तगडे आव्हान आहे. भाजप नेते नितीन नवीन आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा यांचा सामना करावा लागणार आहे.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT