चेन्नईः देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा अहवाल नुकताच लीक झाला असून, त्याचा प्रत्येय तमिळनाडू विधानसभेत आला आहे. सफाई कामगाराच्या 14 जागांसाठी 4607 अर्ज आले आहेत. यामध्ये उच्च शिक्षीत युवकांचा समावेश आहे.
तामिळनाडू विधानसभेने 26 सप्टेंबर रोजी सफाई कामगाराच्या 14 जागांसाठी अर्ज मागवले होते. सफाई कामगारासाठी फक्त दोनच अटी लागू होत्या. एकतर 18 वर्षे पुर्ण असावे व तो शारीरिकदृष्या तंदुरुस्त असावा. परंतु, 14 जागांसाठी तब्बल 4607 अर्ज आले असून, त्यामध्ये एम टेक, बी टेक, एमबीए, उच्च पदवीधर व पदवीधर युवकांनी अर्ज केले आहेत. 4607 पैकी 677 अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
सफाई कामगाराच्या जागेसाठी उच्च शिक्षीत युवक अर्ज करत आहेत. यावरून बेरोजगारीची भीषणता दिसून येते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा रोजगारासंबंधी अहवाल लीक झाला होता. त्यामध्ये गेल्या 45 वर्षात 201718 मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता, असे म्हटले होते. देशातील बेरोजगारीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.