RBI  esakal
देश

RBI News: बँकांकडे पडून आहेत 48,262 कोटी रुपये; कोणी वालीचं नाही

देशामध्ये अशी अनेक बचत आणि चालू खाती आहेत ज्यामध्ये गेल्या 10 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

RBI Office Attendant : देशातील अनेक बँकांमध्ये लाखो कोटी रुपये जमा आहेत मात्र, यावर दावा करणारे कुणीच नाहीयेत. अनेक खात्यांमधील मुदत ठेवी मॅच्युअर झाल्या पण त्यावर कुणाचेच नॉमिनेशन नाहीये. देशातील अशा प्रकारच्या अनक्लेम्ड रकेमेसाठी बँका आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यानंतरहीया रकमांवर कोणीही दावा केलेला नसून, अशा प्रकारच्या ठेवींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे अशा ठेवींमुळे आरबीआयची चिंता वाढत असून, बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयतर्फे राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम 8 राज्यांमध्ये सुरू आहेत जेथे दावा न केलेल्या ठेवी सर्वाधिक आहेत.

बँकांमध्ये ४८,२६२ कोटींची रक्कम

रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात बँकांमधील दावा न केलेली रक्कम 48,262 कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम 39,264 कोटी रुपये होती. RBI च्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा/आंध्र प्रदेशच्या बँकांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा आहे.

का होतीय वाढ
हक्क नसलेल्या ठेवींमध्ये वाढ होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बचत खाते आणि चालू खाते बंद न करणे हे एक प्रमुख कारण आहे. अनेक बँक खातेदार त्यांना व्यवहार करायचे नसलेले खाते बंद करत नाहीत. मात्र, अशी अनेक खाती आहेत ज्यामध्ये रक्कम तर आहे, मात्र त्याला कुणीचा नॉमिनेशन नाही. तसेच, अनेक खातेदारांच्या मृत्यूनंतर, नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारसदार पैसे मागण्यासाठी पुढे येत नसल्यादेखील दावा न केलेल्या ठेवींमध्ये वाढ होत आहे.

खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार नाही

देशातील अनेक खाती अशी आहेत ज्यात 10 वर्षांपासून कोणत्याही प्रकरचे व्यवहार झालेले नाही किंवा 10 वर्षांपासून या रकमांवर कोणताही दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या रकमेला 'अनक्लेम डिपॉझिट' असे मानली जाते. तथापि, ठेवीदारांना त्यांची रक्कम व्याजासह बँकेकडून मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, बँकांनी जागरुकता मोहिमा राबवूनही दावा न केलेल्या रक्कमेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

बँकांमध्ये जमा असलेली आणि दावा न केलेली रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस (DIA) फंडात वर्ग करण्यात आली आहे. अनेक वेळा ग्राहक नवीन बँकेत खाते उघडतात आणि जुन्या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार होत नाही. याशिवाय मृत ठेवीदारांच्या खातेदेखील आहेत, जेथे नामनिर्देशित/कायदेशीर वारसा संबंधित बँकेकडे दावा करण्यासाठी पुढे येत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT