Rajasthan Crime News
Rajasthan Crime News esakal
देश

आजारी बापाला तूप आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये 3 BSF जवानांचाही सहभाग

सकाळ डिजिटल टीम

बलात्कार प्रकरणात तीन BSF जवानांचा देखील समावेश आहे.

श्रीगंगानगर : राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात (Rajasthan Sriganganagar) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. तरुणीनं पाच जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय. यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) तीन जवानांचा देखील समावेश आहे.

मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलंय. सामूहिक बलात्काराचं हे प्रकरण श्रीगंगानगर जिल्ह्यातील रायसिंगनगर पोलिस स्टेशन (Raisinghnagar Police Station) हद्दीशी संबंधित आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक बनवारीलाल मीना (Banwarilal Meena) यांनी सांगितलं की, पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार ती शुक्रवारी रात्री रायसिंगनगरमधील एका खासगी डेअरीत तिच्या आजारी वडिलांच्या उपचारासाठी गायीचं तूप घेण्यासाठी गेली होती. तिथं पाच तरुणांनी तिला पकडलं आणि त्यांनी तिला जबरदस्तीनं एका खोलीत नेलं. त्यानंतर या पाचही जणांनी तिच्यावर खोलीत आळीपाळीनं बलात्कार केला. पीडितेनं कशीबशी त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून तेथून पळ काढला आणि या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली.

दरम्यान, पीडितेच्या वतीनं अहवाल नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तीन बीएसएफ जवानांसह पाच आरोपींना ताब्यात घेतलं. सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी रायसिंगनगर पोलिस उपअधीक्षक अनु बिश्नोई तपास करत आहेत. कलम 164 अंतर्गत पीडितेचे जबाबही नोंदवले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पीडित मुलगी डेअरी चालकांना ओळखत होती. त्यामुळंच तिनं दोघांची नावं पोलिसांना सांगितली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT