Maharashtra 
देश

कोरोनामुळे महसूल वसुलीवर परिणाम झाल्याने भांडवली खर्चासाठी राज्याला ५१४ कोटी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनामुळे महसूल वसुलीवर परिणाम झाल्याने आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या राज्यांना भांडवली खर्चासाठी केंद्राच्या आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत विशेष मदत मिळाली आहे. महाराष्ट्रासह २७ राज्यांच्या एकूण ९८७९.६१ कोटी रुपयांच्या भांडवली खर्चास मंजुरी देण्यात आली असून, या योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी ४९३९.८१ कोटी रुपयांचा निधी राज्यांना मिळाला आहे. यात महाराष्ट्राला ५१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील निम्मी रक्कम म्हणजे २५७ कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १२ ऑक्टोबरला या योजनेची घोषणा केली होती. तमिळनाडू वगळता उर्वरित सर्व राज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. भांडवली खर्चाचा परिणाम गुणाकार श्रेणीत होत असल्याने अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर वाढेल यासाठी केंद्राने राज्यांच्या भांडवली खर्चासाठी विशेष साहाय्य योजनेला २०२० - २१ या वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे.

आरोग्य, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जलसंधारण, ऊर्जा, वाहतूक, शिक्षण, शहरी विकास अशा अनेक क्षेत्रातील भांडवली खर्चाच्या योजनांसाठी हा निधी वापरता येणार आहे. 

राज्यांना मंजूर झालेला मिळालेला निधी असा (रक्कम कोटी रुपयांमध्ये) 
महाराष्ट्र - मंजूर निधी ५१४ कोटी रुपये, मिळालेला निधी २५७ कोटी रुपये

बिहार - ८४३  आणि ४२१ 
मध्यप्रदेश - ६६० आणि ३३० 
राजस्थान - ५०१  आणि २५०  
उत्तर प्रदेश - १५०१ आणि ७८०  
पश्चिम बंगाल - ६३०  आणि ३१५

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

SCROLL FOR NEXT