Gujarat Accident News esakal
देश

Gujarat : अंबाजी दर्शनासाठी जाणाऱ्या 12 भाविकांना कारनं चिरडलं; 6 जणांचा जागीच मृत्यू

भाविक अंबाजी दर्शनासाठी पायी जात होते.

सकाळ डिजिटल टीम

भाविक अंबाजी दर्शनासाठी पायी जात होते.

Gujarat Accident News : गुजरातमध्ये भरधाव कारनं 12 भाविकांना चिरडलंय. यातील सहा भाविकांचा जागीच मृत्यू झालाय. यातील बहुतांश भाविक पंचमहाल जिल्ह्यातील कालोल येथील रहिवासी असून ते अंबाजी दर्शनासाठी (Ambaji Temple Gujarat) पायी जात होते.

या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी भाविकांना रुग्णालयात नेलं. गाडीची स्थिती पाहूनच अपघाताचं गांभीर्य लक्षात येईल. कारच्या पुढील भागाचं पूर्णपणे नुकसान झालंय. गुजरातचे अंबाजी मंदिर हे शक्ती, भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम असल्याचं म्हटलं जातं. या देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gujarat Accident News

रक्षाबंधनादिवशीच भीषण अपघात

यापूर्वी रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) दिवशी आनंद जिल्ह्यात भीषण अपघात झाला होता. इथं झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील पीडित महिला रक्षाबंधन साजरा करून परतत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तहसीलमधील डाली गावाजवळ घडला. इथं कार, ऑटो रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT