social media defamation & extrotion jalgaon news esakal
देश

देशातील ७३ टक्के मुलांना सोशल मीडियाचं व्यसन; १० पैकी तीन नैराश्यग्रस्त - Study

बंगळुरुस्थित राष्ट्रीय मानसिक तपासणी आणि तांत्रिक विज्ञान संस्थेनं (निम्हांस) याबाबत संशोधन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात सोशल मीडियाच्या वापराबाबत केलेल्या एका अभ्यासात धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, सध्या देशातील ७३ टक्के मुलांना सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांना अक्षरशः सोशल मीडियाचं व्यसनचं जडलं आहे. या व्यसनाचे गंभीर परिणामही दिसून येत आहेत. त्यानुसार १० पैकी ३ मुलं ही नैराश्यग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. (73 Percent Indian Children On Social Media, Three Depressed)

बंगळुरुस्थित राष्ट्रीय मानसिक तपासणी आणि तांत्रिक विज्ञान संस्थेनं (निम्हांस) याबाबत संशोधन केलं आहे. या संशोधनानुसार, देशात ७३ टक्के मुलं मोबाईल युजर्स आहेत. यांपैकी ३० टक्के विद्यार्थ्यांना मानसिक विकार जडला आहे. एकूण ७३ टक्क्यांपैकी १० टक्के मुलं तर नैराश्यग्रस्त बनले आहेत. त्यांच्यामध्ये भीती, चिंता तसेच चिडचीडपणाची लक्षण दिसून येत आहेत. काहींचं अभ्यासात लक्ष लागत नाही तर अनेकजण फोन जवळ असल्याशिवाय जेवणही करत नाहीत.

दरम्यान, नवी दिल्लीतील एम्समधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यतन पाल सिंह म्हणतात, त्यांच्याकडे महिन्याभरात १५ ते १६ मुलं काऊन्सिलिंगसाठी येतात. यांपैकी ९० टक्के साधारण ते गंभीर स्थितीतील असतात. या मुलांमध्ये मानसिक आजाराच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील लक्षण दिसून येतात.

सायबर बुलिंग : निशाण्यावर सर्वाधिक मुली

सायबर बुलिंग म्हणजे काय? तर एकप्रकारे ऑनलाईन छळवणूक होय. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सायबर बुलिंगला बळी पडलेली प्रकरणं समोर येत आहेत. यांपैकी मोठ्या प्रमाणावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑनलाईन स्टडी आणि इंटरनेट अॅडिक्शन अभ्यासानुसार ५० टक्क्यांहून अधिक सायबर बुलिंगच्या प्रकरणांची नोंदच होत नाही. कारण मुलींना आपला त्रास शेअर करता येत नाही. त्यामुळं त्या हळू हळू नैराश्यग्रस्त होत जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

Solapur Water Crisis: उजनी धरणात उणे २४.३७% पाणीसाठा, साेलापूर जिल्ह्यातील ४४ तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT