8 dead in Andhra Pradesh cyclonic storm to weaken gradually
8 dead in Andhra Pradesh cyclonic storm to weaken gradually 
देश

'तितली'मुळे आंध्रात 8 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशात धडकलेल्या 'तितली' या चक्रीवादळामुळे आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला.

ओडिशाच्या किनाऱ्याला या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. हवामान विभागाकडून यापूर्वीच येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच येथील मच्छिमारांना समुद्रात मासेमारी जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला. बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी निर्माण झालेले ‘तितली’ हे तीव्र चक्रीवादळ आज (गुरुवार) आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या वादळाचे वारे 156 प्रति/किमी वेगाने वाहत आहेत.

अरबी समुद्रातील 'लुबन' हे तीव्र चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या दोन प्रणालींमुळे दोन्ही समुद्रांना उधाण आले आहे. मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील 6 ते 7 हजार दिव्यांचे खांब उखडले जाण्याची शक्यता आहे. सुमारे 4 ते 5 लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, असे जिल्ह्यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी के. धनंजय रेड्डी यांनी सांगितले.

प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा : धर्मेंद्र प्रधान

सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे सर्व पुढे येण्यास योग्य काळाची गरज आहे. मला विश्वास आहे, की हे संकट सर्वांच्या पाठिंब्याने हाताळण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT