Truck Accident at Garhshankar Punjab  esakal
देश

Road Accident : भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं भाविकांना चिरडलं; 8 जण जागीच ठार

पाच भाविक एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चंदीगड : पंजाबमधील गडशंकर (Punjab Garhshankar) इथं काल रात्री उशिरा झालेल्या एका रस्ता अपघातात (Road Accident) आठ भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा सुमारे 50 भाविक बैसाखी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चरण छो गंगेच्या दिशेनं चालले होते. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं त्यांना चिरडलं. या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच भाविक एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व मृत भाविक उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे, बुधवारीच पंजाबमधील गडशंकर भागातील गढी मनोस्वालजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. गडशंकर उपविभागातील श्री खुरालगड साहिब इथं बैसाखीनिमित्त लंगरचं आयोजन करण्यासाठी जात असताना ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT