up pregnant women died due to hospital reuse admit  
देश

काय चाललंय योगींच्या राज्यात? गर्भवती महिला 13 तास अॅम्ब्युलन्समध्येच

सकाळ वृत्तसेवा

लखनौ, ता. ७ (पीटीआय) : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन केल्यानंतर अनेकदा इतर रुग्णांच्या उपचारात अडथळा आल्याचं समोर आलं आहे. खाजगी रुग्णालये सुरू नसल्यानं तसंच कोरोनाच्या भीतीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. आता उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेचा उपचारांअभावी दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करत असतानाच आठ रुग्णालयांनी या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिल्यामुळे १३ तास ही महिला अॅम्ब्युलन्स मध्ये होती असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाजियाबादच्या खोडा कॉलनीतील रहिवासी नीलम कुमारी या ८ महिन्यांच्या गरोदर होत्या. शुक्रवारी सकाळी ६ वाजता त्यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी ते फिरत होता. महिलेच्या पती आणि भाऊ या महिलेला सहा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये घेऊन गेले. मात्र तिला दाखल करुन घेण्यास सर्व रुग्णालयांनी नकार दिला. त्यानंतर या दोघांनी रुग्णवाहिकेमधून या महिलेला इतर दोन रुग्णालयांमध्ये नेले आमच्याकडे बेड उपलब्ध नसल्याचे कारण तिथेही तिला दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या महिलेला शिवालिक रुग्णालय, ईएसआय रुग्णालय, शारदा रुग्णालय, ग्रेटर नोएडामधील सरकारी रुग्णालय, जयपी रुग्णालय, गौतम बुद्ध नगरमधील फोर्टीस रुग्णालय, गाझियाबादमधील वैशाली येथील मॅक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी दिवसभर धावपळ केली. मात्र एकाही रुग्णालयाने तिला दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे तिने रुग्णवाहिकेमध्येच आपले प्राण सोडल्याचे सांगितले जात आहे. या महिलेला जवळजवळ १२ तासांनंतर ग्रेटर नोएडामधील गव्हर्मेंट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जीआयएमएस) रुग्णालयामध्ये दाखल करुन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

दरम्यान, गौतमबुद्ध नगरचे जिल्हाधिकारी एल. व्हाय सुहास यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. “अतिरिक्त जिल्हाधिकारी नाथ उपाध्याय आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी दिपक ओरी हे या प्रकरणाची चौकशी करुन असून या प्रकरणात तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT