PM kisan 
देश

PM किसान योजनेचा येणार 8 वा हप्ता; जाणून घ्या सगळी इत्तंभूत माहिती

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : जर आपण शेतकरी असाल, तर ही माहिती आपल्यासाठी फारच उपयुक्त आहे. पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता या महिन्यामध्ये दिला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचे 11 कोटी 74 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आठवा  हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे. जर आपलं नाव पीएम किसान यादीत असेल तर आपल्यालाही याचा लाभ घेता येईल. आजच आपलं स्टेटस आपण चेक करु शकता. हप्ता थांबला असेल तर तो का थांबलाय हे देखील आपण जाणून घेऊ शकता. त्याला दुरुस्त करु शकता. त्यासाठी आपल्याला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सरकार पंतप्रधान किसानच्या सर्व लाभार्थ्यांची एक यादी जाहीर करते. या यादीत ज्यांचं नाव असतं त्यांनाच याचा लाभ मिळतो. यासाठी आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आपलं नाव या यादीत आहे की नाही? अगदी सात सोप्या अशा स्टेप्सच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊ शकता. आतापर्यंत सरकारने सात हप्ते जमा केले आहेत. आता 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा 8 वा हप्ता जमा होणार आहे. 

सात सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून जाणून घ्या माहिती

  1. https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. या वेबसाईटवर कोपऱ्याला 'Farmers Corner' नावाचा ऑप्शन मिळेल.
  3. ‘Beneficiary Status' च्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल.
  4. या पेजवर आधार नंबर,  बँक खाते अथवा मोबाईल नंबरपैकी एका पर्यायाला निवडा.
  5. आपण ज्या पर्यायाला निवडलं असेल त्याचा क्रमांक भरा
  6. त्यानंतर 'Get Data' पर्यायावर क्लिक करा. याद्वारे आपण आपले अकाउंट स्टेटस चेक करु शकता. आपले पैसे कोणत्या अकाउंटमध्ये आले आहेत, याचीही माहिती आपल्याला मिळेल. यासोबतच 8 व्या हप्ताशी निगडीत सगळी माहिती देखील इथेच प्राप्त होईल. 
  7. जर 'FTO is generated and Payment confirmation is pending’ अशी माहिती येत असेल तर समजून जा की फंड ट्रान्सफरची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा हप्ता अवघ्या काही दिवसांतच आपल्या खात्यात जमा होईल. 

तीन हप्त्यांमध्ये पीएम किसान योजना
पंतप्रधान किसान सन्मान योजना मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 ला सुरु केली होती. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू झाली आहे. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षांत शेतकऱ्यांना 6000 रुपये ती हप्त्यांमध्ये देते. यातील प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा असतो. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पहिला हप्ता एक एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चच्या दरम्यान येतो.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT