crime cas
crime cas सकाळ डिजिटल टीम
देश

नातीसाठी 'सैतान' ठरलेल्या पोटच्या गोळ्याला आईनं शिकवला धडा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 13 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आपल्या मुलाच्या विरोधात एका 60 वर्षीय आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. विशेष पोक्सो न्यायालयाने 37 वर्षीय आरोपी वडिलाला दोषी ठरवून 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी 60 वर्षीय आजीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (a 60 year old mother stood against her son who repeatedly raped his 13 year old daughter)

“एवढ्या म्हातारपणी नातवंडाची काळजी घेत न्याय मागितल्याबद्दल आजींचे कौतुक केले पाहिजे", असे विशेष न्यायाधीश भारती काळे सोमवारी म्हणाल्या.

घटनेच्या सात वर्षांपूर्वी मुलीची आई कुटुंब सोडून गेली होती. मुलगी तिचे वडील, आजी-आजोबा, काका आणि दोन भावंडांसोबत दहा बाय दहाच्या खोलीच्या राहत होती.

आरोपी वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केल्यानंतर एका वर्षाने मे २०२१ मध्ये तिने तिच्या आजीला सांगितले होते. आजीने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. नात आणि आजी या दोघींनीही आरोपीविरुद्ध न्यायालयात बाजू मांडली. पिडीत मुलीने सांगितले की जेव्हा सर्वजण झोपायचे तेव्हा तिचे वडील खोलीच्या एका कोपऱ्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचे आणि त्याने तिला धमकावले.

न्यायालयाने दोषी वडिलाची याचिका फेटाळली असून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यासंदर्भात 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT