Boy changed newton’s fouth law in Funny way 
देश

चिमुरड्याने बदलला न्युटनचा चौथा नियम; IAS अधिकारी म्हणाला...

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर (Twitter) मुलाच्या नोटबुकचा फोटो (Photo of Notebook) शेअर केला आहे. ज्यामध्ये मुलाने न्यूटनचा चौथा नियम (Fourth law of Newton) मजेशीर पद्धतीने समजावून सांगितला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Funny Fourth law of Newton: आजकालची पोरं काय करतील याचा नेम नाही. त्यांच्या डोक्यातून कधी आणि काय बाहेर येईल हे सांगता येत नाही. इकडे देशभरात कोविड-19 ची प्रकरणे वाढत आहेत. कार्यालये आणि शैक्षणिक संस्था पुन्हा ऑनलाइन मोडवर स्विच होत आहेत. पण या दरम्यान, एका मुलाने चक्क न्यूटनचा चौथा नियमच बदलून टाकलाय. न्यूटनचा चौथा नियम समजावून सांगण्यासाठी मुलाने कोरोनाव्हायरस साथीचा वापर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Boy changed newton’s fouth law in Funny way)

IAS अधिकारी अवनीश शरण (Avinash Sharan) यांनी ट्विटरवर (Twitter) मुलाच्या नोटबुकचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये मुलाने न्यूटनचा चौथा नियम मजेशीर पद्धतीने समजावून सांगितला आहे.

त्यांनी लिहिले, "न्यूटनचा चौथा नियम: जेव्हा कोरोना वाढतो तेव्हा शिक्षण कमी होते आणि जेव्हा कोरोना कमी होतो तेव्हा शिक्षण वाढते." म्हणजेच कोरोना हा शिक्षणाचा उलट आहे.

विद्यार्थ्याने कोरोना आणि अभ्यास यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी एक समीकरण देखील वापरले. त्याने 'k' चा वापर नियतांक म्हणून केला आणि त्याला 'बरबादी' स्थिरांक म्हटले आहे.

आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये शरण म्हणाले की, हे मूल कोरोना युगातील न्यूटन आहे. या पोस्टला ट्विटवर आतापर्यंत 11 हून अधिक लाईक्स आले आहेत. एका यूजरने गंमतीने कमेंट करताना म्हटले, "वाह... याने कोरोना कोळून प्यायला आहे." दुसर्‍याने लिहिले, "कोरोनाचा नवीन कायदा आला आहे." तिसऱ्या वापरकर्त्याने "न्यूटनचा कोविडचा चौथा नियम" अशी टिप्पणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Sangli : आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

SCROLL FOR NEXT