mask esakal
देश

दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती; नियमभंग केल्यास ५०० रुपये दंड - सूत्र

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसेच या नियमाचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला ५०० रुपयाचा दंडही भरावा लागणार आहे. एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली. (a fine of Rs 500 will be imposed on violators for not wearing masks in Delhi)

दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं सक्तीचं होणार असल्याच्या दिवसभर चर्चा सुरु होत्या. यावर कुठलाही अधिकृत निर्णय झाला नव्हता. मात्र, आता एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिल्लीत मास्कसक्ती झाल्याचं म्हटलं आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी शाळा अद्याप बंद होणार नाही. शाळांसाठी तज्ज्ञांशी बोलून मार्गदर्शक तत्व जारी केले जातील. यासोबत कोरोना चाचण्या देखील करण्यात येतील. लसीकरणाचा वेग वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाहीतर मास्क लावणे पुन्हा अनिवार्य करण्यात आले. मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले होतं. तसेच मास्कसाठी दंड आकारण्याची कोणतीही योजना नसल्याचंही म्हटलं होतं.

केंद्रानं मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या पाच राज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग कुठेही पसरू नये यासाठी कठोर कारवाईचा इशारा दिला होता. गरज भासल्यास कठोर पावलं उचलण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली आणि चार राज्यांना “चाचणी, ट्रेसिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड या पंचसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या पत्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. कोरोनाच्या बाबतीत हलगर्जी करू नका. कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये यासाठी काळजी घ्या, असं या पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT