a horse died due to a heart attack sakal
देश

WorldCup: भारत-दक्षिण आफ्रिका सामना संपताच घोड्याचा मृत्यू, इडन गार्डन स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

WorldCup: फटाक्यांचा आवाज सहन न झाल्याने एका घोड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (ता.५) रात्री मृत्यू झाला. आयसीसी क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर भारताने मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर येथील इडन गार्डन स्टेडिअममध्ये फटाके फोडण्यात आले त्यावेळी ही घटना घडली.

क्रिकेट सामन्यावेळी इडन गार्डन येथील बंगाल क्रिकेट संघटना (सीएबी) क्लबच्या बाहेर सुरक्षेसाठी काही घोडेस्वार पोलिस तैनात होते. भारताने सामना जिंकल्यानंतर स्टेडिअमवर एकामागून एक फटाके फुटत असतानाच पोलिसांचे सात ते आठ घोडे बिथरले. त्यांनी पळण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर बसलेले काही पोलिसही खाली पडले. गर्दीतही पळापळ झाली. यात दोन पोलिसांसह चारजण जखमी झाले.

या गोंधळात एका घोड्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला तर काही घोडे जखमी झाले. बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सवाच्या आधी राज्य सरकारने फटाक्यांच्या आवाजाचा मर्यादा ९० डेसिबलवरून १२५ डेसिबलपर्यंत वाढवली होती. १२५ डेसिबलपर्यंत आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT