INS Vikrant
INS Vikrant sakal
देश

INS Vikrant: 1971च्या युद्धातला खरा 'हीरो', वाचा 'विक्रांत'चा रोमांचक इतिहास

निकिता जंगले

भारतचं पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांत आजपासून भारताच्या नौदलात कार्यान्वित होणार आहे. भारतासाठी हा खुप मोठा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा या स्वदेशी नौकेचा उद्घाटन सोहळा पार पडला.

खरं तर भारताच्या समुद्राचा इतिहास खुप समृद्ध आणि गौरवशाली आहे. देशाच्या समुद्री आणि सैन्याच्या इतिहासाचा गौरव वाढविण्यात नौदलाचे महत्त्वाचे योगदान आहे. जेव्हा जेव्हा भारतीय नौदलाच्या जहाजांच्या योगदानाची आठवण येते तेव्हा प्रत्येकवेळी एक नाव समोर येतं, ते म्हणजे आईएनएस (इंडियन नेवल शिप) विक्रांतचे नाव.

1961 वर्षी या विमानवाहक जहाजला आईएनएस विजयलक्ष्मी पंडित यांच्या नावाने सेवेत सहभागी करण्यात आले. नंतर त्याचे नाव विक्रांत करण्यात आले ज्याचा संस्कृतमध्ये पराजय आणि धैर्यवान असा अर्थ होतो. (a real hero in 1971 war read history of INS Vikrant Aircraft)

युद्धात महत्त्वाची भूमिका
विक्रांतमुळे भारताच्या समुद्र क्षेत्रात दबदबा वाढला होता. या जहाजाच्या एका बॉयलर्स मध्ये समस्या होती आणि ठराविक वेगात या जहाजाला काम करावं लागायचं तरीसुद्धा 1971 मध्ये भारत-पाक युद्धात या जहाजामुळे पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला.

आईएनएस विक्रांतच्या फक्त नावानेच पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण झाली होती. एवढंच काय तर पाकिस्तान त्यावेळी या जहाजाला नष्ट करण्याच्या विचारात होते. 1971च्या युद्ध दरम्यान पाकिस्तानकडून जहाज पीएनएस गाजी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय नौसेनेने पाकिस्तानला चकमा दिला आणि आईएनएस राजपूतला आईएनएस विक्रांत बनवत समोर केले. जेव्हा पाकिस्तानी जहाज पीएनएस गाजीने आईएनएस राजपूतवर विक्रांत समजून हल्ला केला. आणि त्यावेळी आईएनएस राजपूत ने गाजीला नष्ट केले.

सेवामुक्ती
युद्धानंतरआईएनएस विक्रांतच्या इंजिन, बॉयलर आणि अन्य उपकरणांना सुधारण्यासाठी जहाजाचा जीर्णोद्धार करण्यात आला. मात्र काही वर्षापर्यंत सेवेत राहल्यानंतर त्याचं काम समाधानकारक नव्हतं, ज्यामुळे 1997मध्ये या जहाजाला सेवामुक्त करण्यात आले. सेवामुक्तिनंतर आईएनएस विक्रांत आकर्षणाचे केंद्र ठरले. सर्व देशाचे लोक याला पाहण्यासाठी यायचे. याची लोकप्रियता पाहता भारत सरकारने याला तरंगत्या संग्रहालयात ठेवण्याचा निर्णय घेतला. हे जहाज मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ ठेवण्यात आले आणि याचं नाव बदलून आईएमएस विक्रांत करण्यात आले. आईएमएसचं पुर्ण नाव इंडियन म्युजियम शिप है।

पुन्हा बनविण्यात आले आईएनएस विक्रांत
आईएनएस विक्रांत नावावरुन पुन्हा भारताचे एक स्वदेशी विमानवाहक जहाज तयार करण्यात आले. INS विक्रांत नौकेच्या चाचण्या नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आल्या होत्या. यानंतर दोन वर्षांनंतर जुलै 2022 मध्ये याच्या समुद्री चाचण्यासुद्धआ करण्यात आल्या. कोचिन शिपयार्डने यावर काम केले. चाचणी पूर्ण झाल्यानंतर जुलै मध्येच कोचीन शिपयार्डने हे विमानवाहक जहाज नौदलाकडे सुपूर्द केले.

या विमानवाहू नौकेत 76% स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. INS विक्रांतला जवळपास 20 हजार कोटी खर्च आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT