नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ( UIDAI ) ने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसा , जर तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा नावनोंदणी स्लिप नसेल, तर तुम्ही सरकारी योजनाचा अर्थात सबसिडी आणि योजनाचा लाभ घेण्यास पात्र होऊ शकत नाही. (Aadhaar number mandatory to get govt benefits-subsidies says UIDAI)
UIDAI ने गेल्या आठवड्यात सर्व केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांना एक परिपत्रक जारी केले होते. हे परिपत्रक 11 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले होते. परिपत्रकामध्ये आधार क्रमांक नसताना सरकारकडून देण्यात येणारी सबसिडी आणि योजनांचा लाभ घेत असलेल्या लोकांसाठी आधार नियम कडक करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
सरकारी योजनांतर्गत लाभ/सबसिडी/सेवांच्या वितरणासाठी लाभार्थ्यांची पात्रता ठरवण्यासाठी वापरली जाणारी सरकारची प्रमाणपत्रे तुम्हाला हवी असल्यास, त्यांच्याकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान कायद्याच्या कलम 7 मधील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला आधार क्रमांक नियुक्त केला गेला नसेल, मात्र त्याने आधारसाठी अर्ज केलेला असेल तर तो व्यक्ती आधार नोंदणी ओळख (EID) क्रमांक/स्लिपसह सरकारी योजनांचा आणि लाभाच्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. ताज्या परिपत्रकात म्हटले की देशातील 99 टक्क्यांहून अधिक प्रौढांना आधार क्रमांक जारी करण्यात आलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.