Shraddha Walker Aaftab Poonawala Sakal
देश

Shraddha Murder Case : मृतदेह फ्रीजमध्ये असताना 'तो' त्याच फ्लॅटवर दुसऱ्या मुलींसोबत सेक्स करायचा!

डेटिंग अॅप्सच्या माध्यमातूनच आफताब या मुलींच्या संपर्कात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे सध्या संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या प्रियकराने सुनियोजित पद्धतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते जंगलात फेकून दिले. त्यानंतर श्रद्धाचा मृतदेह घरात असताना त्याने त्याच घरात दुसऱ्या मुलीसोबत सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

श्रद्धाचा प्रियकर आफताबने तिचा खून केला, तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. न्यूज १८ आणि द ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या खुनानंतर आफताब तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अॅक्टिव्ह राहत होता. श्रद्धाचा मृतदेह तशाच अवस्थेत फ्रीजमध्ये पडून होता. त्यावेळी आफताब दुसऱ्या एका मुलीच्या संपर्कात आला. डेटिंग अॅपच्या माध्यमातून आफताब या मुलीच्या संपर्कात आला होता.

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

पण, फक्त ही एकटीच नव्हती जी श्रद्धाचा मृतदेह घरात असताना या घरात आली होती. आफताबने डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेक मुलींची भेट घेत त्यांच्यासोबत सेक्स केला होता. या प्रकारानंतर आता दिल्ली पोलीस बम्बल अॅपला पत्र लिहीत श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना घरी आलेल्या महिलांची माहिती घेणार आहेत. तसंच या खुनामागे या महिलांपैकी कोणी आहे का, याची चौकशीही केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Haveli News : १५ वर्षांनंतर यशवंत साखर कारखान्याच्या जमिन विक्रीला मुहूर्त; पुणे बाजार समितीकडून ४९.१८ एकर खरेदी

Hadapsar News : वयाची तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच 'इयारा'च्या नावे चौदा प्रकारचा दस्तऐवज

'Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघातूनच मी वगळलं असतं...' श्रीलंकेविरुद्धच्या भांडणानंतर संजय मांजरेकरांचं खळबळजनक भाष्य

काळाचा थरकाप उडवणारा दिवस! माळीण दुर्घटनेवर आधारित 'एक होतं माळीण' चित्रपट 'या' दिवशी रिलीज होणार!

बँकेपेक्षा जास्त व्याज, जोखीम शून्य! पोस्ट ऑफिसपासून PPF पर्यंत... 'या' ५ सरकारी योजनांमध्ये मिळतोय आकर्षक परतावा

SCROLL FOR NEXT