Aam Aadmi Party leaders announcing the first list of candidates for the upcoming Bihar Assembly Election 2025, emphasizing clean governance and people-centric politics.

 

esakal

देश

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Bihar Assembly Election 2025: आम आदमी पार्टी बिहारमधील सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे; जाणून घ्या, पहिल्या उमेदवार यादीत किती जणांना संधी दिली?

Mayur Ratnaparkhe

AAP Releases First Candidate List for Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या ताराखांची आज(सोमवार) निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची चिन्हं आहेत. मात्र त्यापूर्वीच आम आदमी पार्टीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत आम आदमी पार्टीकडून ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी अजेश यादव आणि अध्यक्ष राकेश यादव यांनी पत्रकारपरिषदेत ही यादी जाहीर केली आहे. 

आम आदमी पार्टीने बेगूसराय, कुशेश्वरस्थान, सरैया, कस्बा, बेनीपट्टी, फुलवारी शरीफ, बांकीपुर, किशनगंज सदर, परिहार, गोविंदपुर आणि बक्सर या ११ ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत.

या ११ जणांच्या यादीत  डॉ. मीरा सिंह, योगी गोपाला, अमित कुमार सिंह, भाव भारती, शुभम यादव, अरुण कुमार रमक, डॉ. पंकज कुमार, अजहर आलम, अरविन्द नारायण ठाकुर, अशोक कुमार सिंह आणि माजी कॅप्टन संजय सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.

आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आङे की, बिहारच्या सर्व २४३ जागांवर पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. पक्षाची रणनीती दिल्ली आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये आजमावलेल्या केजरीवाल मॉडेलला बिहारमध्ये लागू करण्याची आहे. ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचे आश्वासन दिले गेले आहे. तसेच पक्षाचे लक्ष्य बिहारमधील पलायन, बेरोजगारी आणि महागाई यासारख्या मुद्द्यांवर असणार आहे, हे मुद्दे निवडणूक प्रचारादरम्यान जनतेसमोर मांडले जाणार आहेत.

विशेषबाब म्हणजे असं सागितलं जात आहे की, NDA आणि INDIA आघाडीत उमेदवार आणि जागा वाटपावरून अद्यापही चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत, तर आता आम आदम पार्टीने पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्याने दोन्ही आघाड्यावंर एकप्रकारे काहीसा दबाव निर्माण झालेला आहे. मागील निवडणुकीत बिहारच्या राजकारणात एनडीए आणि इंडिया आघाडीचा दबदबा पाहायाल मिळाला होता. यंदा आम आदमी पार्टीच्या रूपाने बिहारच्या राजकारणात तिसरी राजकीय ताकद उदयास आल्याचे दिसत आहे. याशिवाय यंदा प्रशांत किशोर यांची जन सूराज पार्टी देखील निवडुकीच्या रिंगणात असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT