AAP Jail Ka Jawab Vote Se song ECI asked to modify the content of election campaign song marathi News  
देश

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेले गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (आप) मनाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २८ ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेले गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (आप) मनाई केली आहे. दोन मिनिटांच्या या प्रचार गाण्यात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दाखविण्यात आले आहे. ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांनी हे गाणे लिहिले आहे.

केजरीवाल, सिसोदिया तसेच अन्य ‘आप’ नेत्यांच्या अटकेला विरोध करणारे प्रचार गाणे ‘आप’ने काही दिवसांपूर्वी जारी केले होते. 'तुरुंगाचे उत्तर मतांद्वारे' असा या गाण्याचा आशय होता. या गाण्यात ‘आप’ नेत्यांच्या अटकेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे वापरण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीनुसार या गाण्याद्वारे सत्ताधारी पक्ष आणि तपास संस्थांची खराब प्रतिमा दाखविण्यात आली आहे. यावर आम्ही कोणत्याही प्रकारे आचारसंहिता तोडलेली नाही, असा दावा आतिशी यांनी केला. प्रचार गाण्यामध्ये कुठेही भाजपचे नाव घेण्यात आलेले नाही. ‘तुरुंगाचे उत्तर मतांद्वारे’ या वाक्याला आयोगाने आक्षेप घेतला आहे. मात्र त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही. गाण्याद्वारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असे आतिशी यांनी सांगितले.

गाणे वापरण्यास मनाई करण्यात आल्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतर ‘आप’ नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आहे. ‘‘हुकूमशाही सरकारांमध्ये विरोधी पक्षांना प्रचार करण्यापासून रोखले जात आहे,’’ असा आरोप आतिशी यांनी केला. त्या म्हणाल्या की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणा पक्षाचे प्रचार गाणे रोखण्यात आले आहे. भाजपकडून वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले, मात्र त्या पक्षाविरोधात आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: ३१ तासांच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचा समारोप, ढोल-ताशांच्या गजरात पुणेकर मंत्रमुग्ध

Ganpati Visarjan 2025 Live Updates : विट्याच्या राजा गणेशमूर्तीला भक्तीभावाने निरोप

Latest Maharashtra News Live Updates: तामिळनाडूत मुसळधार पाऊस! विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली, नागरिकांचे हाल

Valley of Flowers Maharashtra: महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहायचंय? मग भेट द्या साताऱ्याजवळील या निसर्गरम्य ठिकाणी!

Chapati Reheating : चपाती पुन्हा गरम करून खावू नये..पण का? डॉक्टर काय सांगतात पाहा..

SCROLL FOR NEXT