modi 
देश

दिल्ली: PM मोदींविरोधात पोस्टर लावण्यामागे आप

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीत अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लस पॉलिसीला विरोध करणारे पोस्टर लावण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई केली असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 25 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिली पोलिसांनी याप्रकरणात मोठा खुलासा केला आहे. दिल्लीतील पोस्टर प्रकरणामागे आम आदमी पार्टी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आप सदस्य अरविंद गौतम यांच्या सांगण्यानुसार शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आल्याचं दिल्ली पोलिस म्हणाले. अरविंद गौतम सध्या फरार आहे. (AAP Member Behind Delhi Posters Against PM Delhi Police)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लस पॉलिसीला विरोध करत दिल्लीत पोस्टर्स-बॅनर्स लावण्यात आले होते. मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांच्या लशी परदेशात का पाठवल्या, असा मजकूर यावर लिहिण्यात आला होता. कोरोना काळात मोदी सरकारकडून लशींचा पुरवठा परदेशात करण्यात आला होता. देशात आवश्यकता असतानाही मोदींनी लशीची निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. याला विरोध म्हणून दिल्लीत अशाप्रकारचे पोस्टर्स-बॅनर्स लावण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.

दिल्लीतील पोस्टर प्रकरणात अनेकांची चौकशी केली जात आहे. यात अरविंद गौतम यांचे नाव समोर आले. पोलिसांनी ट्विटकरुन माहिती दिली की, मनगोलपूर भागातील आप सदस्य अरविंद गौतम या प्रकरणामागे असल्याचं स्पष्ट झालंय. पोस्टर्स-बॅनर्स कोठे प्रिंट करण्यात आले याची माहिती त्यावर देण्यात आली नव्हती. अरविंद गौतम यांनी या कामासाठी 9 हजार रुपये दिले होते.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याप्रकरणात उडी घेतली होती. ''मलाही अटक करा'', अशा कॅप्शनखाली राहुल गांधींनी एक फोटो शेअर केला होता. यात त्यांनी, तुम्ही आमच्या मुलांच्या लशी परदेशात का पाठवल्या, असं लिहिलं होतं. देशात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. अशात देशातील लोकांचे लसीकरण आवश्यक आहे. अशात मोदी सरकारने परदेशात लस पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीची गृह विभागाकडून दखल; जिल्हा प्रशासन, पोलिसांचे मॅरेथॉन बैठक; अहवाल लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे

Vaishnavi Hagawane Case Update : नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण

Pune Crime : गोकुळनगरमध्ये तरुणावर कोयत्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक

Mumbai News: गेट वे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT