ABVP esakal
देश

आता 'या' सर्वात मोठ्या शहराचं नाव बदलणार? नामकरणासाठी ABVP, RSS आक्रमक

कायदेशीर अडथळे दूर करून आवश्यक पाठबळ मिळाल्यास भारतीय जनता पक्षाचं सरकार अहमदाबादचं नाव 'कर्णावती' ठेवेल.

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबादचं नाव बदलून कर्णावती करण्याचा ठराव इथं आयोजित विद्यार्थी परिषदेत 5 हजार विद्यार्थ्यांनी मंजूर केला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते अहमदाबादचं (Ahmedabad) नाव बदलून 'कर्णावती' (Karnavati) करणार असल्याचं जाहीर केलंय, यासाठी त्यांनी मोहीमही सुरू केलीये.

अभाविपनं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी अधिवेशनात अहमदाबादचं नाव बदलून ‘कर्णावती’ करण्याची मोहीम राबविण्याचा ठराव मंजूर केलाय.

ABVP च्या गुजरात युनिट सेक्रेटरी युती गाजरे यांनी सांगितलं की, 'अहमदाबादचं नाव बदलून कर्णावती करण्याचा ठराव इथं आयोजित विद्यार्थी परिषदेत 5 हजार विद्यार्थ्यांनी मंजूर केला. आमच्या मागण्यांसाठी आता आम्ही महसूल अधिकारी, जिल्हादंडाधिकारी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना निवेदन देणार आहोत.'

कायदेशीर अडथळे दूर करून आवश्यक पाठबळ मिळाल्यास भारतीय जनता पक्षाचं सरकार अहमदाबादचं नाव 'कर्णावती' ठेवेल, असं गुजरातचे तत्कालीन उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी यापूर्वी सांगितलं होतं. आता पुन्हा ही मोहीम तीव्र झालीये.

Ahmedabad

युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल देसाई म्हणाले, 'सध्या भाजप सर्वच पातळ्यांवर सत्तेत आहे. जर अभाविप अहमदाबादचं नामकरण कर्णावती करण्याबाबत गंभीर असेल, तर ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणं कोणत्याही अडचणीशिवाय ते करेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT