Ravish Kumar
Ravish Kumar esakal
देश

Ndtv Adani Deal : राजीनाम्याच्या वृत्तावर रवीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मोदींनी मला...

सकाळ डिजिटल टीम

अदानी समूहानं मीडिया समूह NDTV मधील 29 टक्के हिस्सा विकत घेतला आहे.

Ravish Kumar News : अदानी समूहानं (Adani Group) मीडिया समूह NDTV मधील 29 टक्के हिस्सा विकत घेतलाय, तेव्हापासून विविध चर्चांना उधाण आलंय. अदानी समूहाची कंपनीवर पकड मजबूत झाल्यामुळं प्रसिद्ध अँकर रवीश कुमार (Ravish Kumar) हेही टीव्ही चॅनलचा राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, खुद्द रवीश कुमार यांनी अगदी खोचक पद्धतीनं त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांबद्दल ट्विट केलंय. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केलाय. “माननीय जनता, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी मला मुलाखत देण्याची जशी अफवा उठली होती तशीच सध्या माझ्या राजीनाम्याची अफवा पसरलीय. मोदी मला मुलाखत देण्यासाठी तयार झाले असून अक्षय कुमार माझ्या घराच्या दाराशी आंबे घेऊन वाट पाहत असल्याची अफवा उठली होती, तसाच हा प्रकार आहे,” असा टोला रवीश कुमार यांनी लगावलाय. “तुमचा रवीश कुमार, जगातील पहिला सर्वात महागडा शून्य टीआरपी असणारा वृत्तनिवेदक आहे,” असंही त्यांनी ट्वीटच्या शेवटी म्हटलंय.

रवीश कुमार यांचं ट्विट मोठ्या संख्येनं लोकांनी रिट्विट केलंय. एनडीटीव्हीची हिस्सेदारी अदानी समूहाच्या हातात गेल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा फेरा जोरात सुरूय. मोठ्या संख्येनं लोक मीम्स देखील शेअर करत आहेत. सोशल मीडियावरही लोकांची मतं विभागली गेली आहेत. रवीश कुमार यांना चांगला पत्रकार म्हणून संबोधत मोठ्या संख्येनं लोकांनी त्यांचं समर्थन केलंय. त्याचबरोबर एक वर्ग असाही आहे, ज्यानं सोशल मीडियावर रवीश कुमार आता काय करणार असा सवाल केलाय.

रवीश कुमार यांची ही प्रतिक्रिया त्यांच्या भविष्याबाबत सुरु असलेल्या अटकळांच्या दरम्यान आलीय. सध्यातरी रवीश कुमार एनडीटीव्हीमध्येच राहणार हे स्पष्ट आहे. एनडीटीव्हीमध्ये अदानी समूहाची हिस्सेदारी असल्याच्या बातम्या आल्यापासून सोशल मीडियावर मीम्सही फिरत आहेत. मात्र, शेअर बाजारात या निर्णयानं उत्साह संचारलाय. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी आलीय. मंगळवारी एनडीटीव्हीचा शेअर (NDTV Shares) 366 रुपयांवर बंद झाला. मात्र, आज (बुधवार) सकाळीच त्यात पुन्हा वाढ झालीय. सध्या तो 388 रुपयांवर व्यवहार करत आहे. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये यंदा 300 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT