Uttar Pradesh Investors Summit 2022
Uttar Pradesh Investors Summit 2022 सकाळ
देश

अदानींची 70 हजार कोटींची गुंतवणूक, हजारोंना मिळणार रोजगार

सकाळ डिजिटल टीम

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी शुक्रवारी अदानी कंपनी उत्तर प्रदेशमध्ये ₹70,000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली. ज्यामुळे उत्तरप्रदेश राज्यात सुमारे 30,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उत्तर प्रदेश गुंतवणूकदार समिट २०२२ (Uttar Pradesh Investors Summit 2022) कार्यक्रमात ते बोलत होते. (Adani invest 70,000 crore in uttar pradesh that would create around 30,000 jobs)

गौतम अदानी म्हणाले, "आम्ही उत्तरप्रदेश राज्यात 70,000 कोटींहून अधिक गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीमुळे 30,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण होतील असा आमचा अंदाज आहे."

अदानी पुढे म्हणाले, "या गुंतवणुकीपैकी ₹ 11,000 कोटी आमच्या ट्रान्समिशन, हरित ऊर्जा, पाणी, कृषी-लॉजिस्टिक्स आणि आमच्या डेटा सेंटर व्यवसायावर आधीच खर्च केले गेले आहेत तर बाकी आम्ही रस्ते आणि वाहतूक अशा पायाभूत सुविधांवर ₹24,000 कोटी आणि मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक तसेच संरक्षण क्षेत्रावर 35,000 कोटींची गुंतवणूक करत आहोत."

सोबतच अदानी यांनी समूह उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारूगोळा संकुल उभारणार असल्याची माहिती दिली. यूपी डिफेन्स कॉरिडॉरमध्ये खाजगी क्षेत्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असणार, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT