Mahua Moitra Sakal
देश

Mahua Moitra: अदानी चंद्रावर बांधणार फ्लॅट पण मुस्लिमांना नो एन्ट्री… महुआ मोईत्रांचा मोदींना टोला

Mahua Moitra: खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

राहुल शेळके

Mahua Moitra: चांद्रयान-3 च्या यशाने, जगभरात भारताचे कौतुक होत आहे. त्यात तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी रविवारी (दि. 27 ऑगस्ट) इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेवर भाष्य करत असताना गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

महुआ मोईत्रा ट्विट करत म्हणाल्या की, ''मोदीजींनी चंद्राच्या काही भागांना तिरंगा आणि शिवशक्ती असे नाव दिले आहे. अदानी आता चंद्राच्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश करतील, चंद्रावर फ्लॅट बांधण्यासाठी निविदा न काढता जागा मिळवतील. मुस्लिमांना तिथे राहण्यास परवानगी नसेल. फक्त शुद्ध शाकाहारी रहिवासी तिथे राहतील.''

शनिवारी (दि. 26 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसचा दौरा संपवून थेट बंगळुरू येथे चांद्रयान 3 साठी काम करणाऱ्या इस्रोच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले.

हिंदुस्तान एरोस्पेस लिमिटेड येथील विमानतळावर लोकांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “चांद्रयान-3 चंद्रावर लँड होताच मला खूपच आनंद झाला. मी त्यावेळी भारतात नव्हतो. त्यामुळेच भारतात गेल्यानंतर सर्वात आधी बंगळुरू येथे जाऊन इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटावे, असे मी ठरवले.”

पंतप्रधान मोदींनी बंगळुरूमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं, त्या ठिकाणाला आता 'शिवशक्ती पॉइंट' असं नाव दिलं जाणार आहे. यासोबतच, चांद्रयान-2 मधील लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या ठिकाणाला 'तिरंगा' म्हटलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT