Sun Aditya L1 Esakal
देश

Aditya L1: सूर्य मोहिमेची मोठी कामगिरी! पहिल्यांदाच सूर्याची जवळून टिपली छायाचित्रे; मोहिमेचं पुण्याशी खास कनेक्शन

या कामगिरीत पुणे शहराचाही जवळचा संबंध असल्याचं समोर आलं आहे, कारण...

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात झेपावलेल्या आदित्य L1 वर या भारतीय अंतरळयानानं सूर्याची अत्यंत जवळून पहिल्यांदाच छायाचित्रे टिपली आहेत. हे या मोहिमेतील मोठं यश मानलं जात आहे. दि सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे (SUIT) ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी सौर निरीक्षण आणि संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. (Aditya L1 captures the Sun see first pictures taken by Indian spacecraft)

SUIT ची महत्वाची कामगिरी

200 ते 400 नॅनोमीटरच्या वेव्हलेन्थ रेंजमध्ये सूर्याच्या अनेक प्रतिमा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सूर्याचा दृश्यमान पृष्ठभाग आणि त्याच्या अगदी वरचा पारदर्शक थर दिसतो आहे. सूर्यावरील ठिपके, फ्लेअर्स आणि प्रॉमिनन्स यांसह विविध सौर घटना समजून घेण्यासाठी हे स्तर महत्त्वपूर्ण आहेत. (Latest Marathi News)

अवकाशातील हवामान आणि पृथ्वीच्या हवामानावर गंभीर परिणामाचा यातून अभ्यास केला जाणार आहे. SUITला 20 नोव्हेंबर 2023 रोजी कमांड देण्यात आली त्यानंतर यशस्वी प्री-कमिशनिंग टप्प्यानंतर 6 डिसेंबर 2023 रोजी त्यानं पहिल्यांदाच प्रतिमा कॅप्चर केल्या.

अकरा फिल्टर्स वापरले

सूर्याच्या वातावरणाचे तपशीलवार निरीक्षण करण्यासाठी दुर्बिणीला अकरा भिन्न फिल्टर्स लावण्यात आले. सूर्याचे ठिपके, प्लेज प्रदेश आणि सूर्याची शांत बाजू यासारखी वैशिष्ट्ये यामध्ये दिसतात. या फिल्टर्समुळं शास्त्रज्ञांना चुंबकीय सौर वातावरणाच्या डायनॅमिक कपलिंगचा आणि पृथ्वीच्या हवामानावर सौर किरणोत्सर्गाच्या प्रभावांचा अभ्यास करता येतो.

मोहिमेशी पुणे शहराचा खास संबंध

पुण्याच्या इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) अर्थात 'आयुका'मधील 50 शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या टीमने विकसित केलेलं SUIT हे Aditya-L1 वरील सात पेलोड्सपैकी एक आहे. या मोहिमेचं उद्दिष्ट फोटोस्फियरपासून क्रोमोस्फियरपर्यंत आणि त्यापलीकडे ऊर्जेचा प्रसार, डायनॅमिक सौर घटनांमागील उद्रेकाच्या प्रारंभिक गतीशास्त्राविषयी अडचणी सोडवणं हा आहे. (Latest Marathi News)

तत्वेच्या कर्करोगासंबंधी संशोधनासाठी महत्वाचं

सौर वातावरणाच्या वेगवेगळ्या उंचीवरील प्रतिमा कॅप्चर करून, SUIT सूर्य-हवामान संबंध तसेच त्वचेच्या कर्करोगाच्या जोखमींवर अतिनील किरणोत्सर्गाचा संभाव्य प्रभावाचा अभ्यास देखील करण्यात येणार आहे.

Aditya यान Lagrange Point 1 पर्यंत पोहोचल्यानंतर वैज्ञानिक या यानाच्या सौरप्रोबच्या पहिल्या प्रतिमांची आतुरतेनं वाट पाहात होते. इस्रोनं म्हटलं आहे की, SUIT च्या निरीक्षणांमुळं शास्त्रज्ञांना चुंबकीय सौर वातावरणाच्या गतिशील जोडणीचा अभ्यास करण्यात मदत होणार आहे तसेच पृथ्वीच्या हवामानावर सौर किरणोत्सर्गाचा प्रभाव कमी करण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT