Karambeer Singh
Karambeer Singh 
देश

भारताच्या नौदल प्रमुखपदी करमबीर सिंह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नौदल अधिकारी (अॅडमिरल) करमबीर सिंह यांनी आज (शुक्रवार) नौदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. माजी नौदल प्रमुख सुनील लांबा आज (ता. 31) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर हा पदभार सिंह यांच्याकडे सोपविण्यात आला. 

सिंह यांच्या नियुक्तीपूर्वी उप नौदल अधिकारी बिमल वर्मा यांनी या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सिंह यांची नौदल प्रमुखपदी नियुक्ती करण्याबाबत वर्मा यांनी आर्म्स फोर्स ट्रिब्यूनलकडे याचिका दाखल केली होती. 

पुढील नौदल प्रमुखाच्या नियुक्तीबाबत वरिष्ठांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे वर्मा यांनी या याचिकेत म्हटले आहे. जुलै 1980 मध्ये सिंह, तर जानेवारी 1980 मध्ये वर्मा नौदलात भरती झाले होते. मात्र, 29 मे रोजी ट्रिब्यूनलने सिंह यांची नौदल प्रमुख पदी निवड करण्यास संमती दर्शविली. 

नौदलाचा पाया मजबूत : सिंह

"माझ्या अगोदरच्या सर्व माजी नौदल अधिकाऱ्यांनी नौदलाचा पाया मजबूत केला आहे. नौदलाला त्यांनी एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे. त्यांच्या प्रयत्नांना आणखी पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. येत्या काळात नौदल अधिक मजबूत आणि विश्वासार्ह बनवू, जेणेकरून सर्व प्रकारच्या आव्हानांना ते तोंड देण्यास समर्थ ठरेल," असे सिंह यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT