Shraddha Walker Murder Case esakal
देश

'आफताबनं श्रद्धावर बहिणीप्रमाणं प्रेम करायला हवं होतं, इस्लाम गैर-मुस्लिमशी लग्न करण्याची परवानगी देत नाही'

'इस्लाम मुस्लिमांना गैर-मुस्लिमांशी लग्न करण्याची परवानगी देत ​​नाही.'

सकाळ डिजिटल टीम

'इस्लाम मुस्लिमांना गैर-मुस्लिमांशी लग्न करण्याची परवानगी देत ​​नाही.'

दारुल उलूम रहमानिया मदरशाच्या (Darul Uloom Rahmaniya Madrasah) मौलानानं श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Walker Murder Case) आक्षेपार्ह विधान केलंय. उत्तर प्रदेशातील लहरपूरमधील मौलाना अहमद कासमी (Maulana Ahmed Qasmi) यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय, 'आफताब पूनावालानं श्रद्धावर स्वत:च्या बहिणीप्रमाणं प्रेम करायला हवं होतं.'

मौलाना कासमी यांनी आफताब आणि श्रद्धाच्या नात्याला विरोध करत म्हटलंय की, 'इस्लाम मुस्लिमांना (Muslim) गैर-मुस्लिमांशी लग्न करण्याची परवानगी देत ​​नाही. इस्लाममध्ये कायदे संहिताबद्ध आहेत. इस्लाम त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना काहीही बोलण्याची किंवा करण्याची परवानगी देत ​​नाही. जो कोणी इस्लामिक कायद्याच्या बाहेर काहीही करतो, त्याला आपण शिक्षा देऊ शकत नाही. परंतु, अल्लाह त्या व्यक्तीला मृत्यूनंतर शिक्षा देत असतो.'

'समलैंगिक संबंध मानवतेसाठी घृणास्पद'

मौलाना म्हणाले, जगाला माहित आहे की लग्नात एक पुरुष आणि एक स्त्री असायला हवी. या जगातील कोणताही धर्म मुलाशी लग्न करणाऱ्या मुलानं किंवा मुलीनं मुलीशी लग्न करण्याचं समर्थन करू शकत नाही. त्यामुळं मानवतेच्या दृष्टिकोनातूनही समलैंगिक संबंध ही घृणास्पद गोष्ट आहे.

अशा लग्नात मुलं कुठून येणार?

ते पुढं म्हणाले, मुलाकडं जाऊन काय करणार? लग्नानंतर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे पती-पत्नी एकत्र राहतात आणि एकमेकांवर प्रेम करतात. ते एकत्र रात्र घालवतात आणि परिणामी मुलं जन्माला येतात. मात्र, पुरुषानं पुरुषाशी लग्न केलं आणि स्त्रीनं स्त्रीशी लग्न केलं तर मुलं कुठून येणार?

'लिव्ह-इन रिलेशनशिप हे इस्लामचं उल्लंघन'

कासमी म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशिप हे इस्लामचं उल्लंघन आहे. कोणत्याही मुस्लिमानं यात सहभागी होता कामा नये. इस्लामिक कायदा लिव्ह-इन रिलेशनशिपला परवानगी देत ​​नाही. एखाद्या व्यक्तीला लग्नाशिवाय संबंध ठेवण्याची परवानगी नाही. मैत्रीचा पाया वेगळा असतो, पण लग्नाशिवाय कोणी नवरा-बायकोच्या बरोबरीच्या नात्यात आलं तर त्याला 'जिना' म्हणतात. आफताबनं हा गुन्हा केलाय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

Indian Army Kupwara Encounter : नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली; लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दल सतर्क

Ind Vs Aus ODI : भारताविरुद्ध मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! सलामीवीर फलंदाजासह फिरकीपटू संघातून बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT