DA Hike esakal
देश

DA Hike : केंद्रापाठोपाठ 'या' राज्यानेही वाढवला महागाई भत्ता; सरकारवर पडणार मोठा बोजा

सकाळ डिजिटल टीम

जयपूरः काल केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ केली. आता राजस्थान सरकारनेही 'DA' मध्ये घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थानच्या गहलोत सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राजस्थान सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. गहलोत सरकाच्या या निर्णयामुळे महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे.

काल केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी केंद्र सरकारने खूशखबरी दिली. केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामधअये ४ टक्के वाढ केलीय. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे. पूर्वलक्षी प्रभवाने ही वाढ लागू होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.

त्यापाठोपाठ राजस्थान सरकारनेही डीएमध्ये वाढ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी ट्विट करुन सांगितलं की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यांमध्ये ४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना १ जानेवारी २०२३ पासून ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

राजस्थान सरकारच्या या निर्णयामुळे ८ लाख सरकारी कर्मचारी आणि ४.४० लाख पेन्शनर्सना लाभ मिळेल. या निर्णयाचा लाभ राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक यांच्यासह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT