Shimla
Shimla 
देश

शिमल्यातील मोदींचे आवडते रेस्टॉरंट बंद

वृत्तसंस्था

शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील आवडते रेस्टॉरंट अखेर बंद झाले आहे. शिमल्यातील मॉलरोडवरील 65 वर्ष जुने बालजीस रेस्टॉरंट मंगळवारी बंद झाले.

शिमल्यातील सर्वात जुन्हा रेस्टॉरंटपैकी एक असणारे हे रेस्टॉरंट 9 जुलैला कायमचे बंद झाले. तेथे मिळणारा गुलाबजामसाठी खूप लोकप्रिय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही येथील गुलाबजाम खूप आवडायचे. मोदी ज्यावेळी हिमालच प्रदेश भाजपाचे प्रभारी होते त्यावेळी ते या रेस्टॉरंटमध्ये गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून यायचे. नुकताच त्यांनी नमो ऍपवरुन एका ब्लॉगमध्ये या रेस्टॉरंटचा आणि तेथे मिळणाऱ्या चविष्ठ गुलाबजामचा उल्लेख केला होता. मोदींबरोबरच इतरही अनेक दिग्गज येथे मिळणाऱ्या गुलाबजामचे चाहते होते.

सर्वोच्च न्यायालयाने 15 जुलैला या रेस्टॉरंटच्या मालकाला जागा खाली करण्याचे आदेश दिले आहे. ही जागा खाली करुन लवकरात लवकर ती खऱ्या मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने या रेस्टॉरंटच्या मालकाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायलयामध्ये या रेस्टॉरंटसंबंधीत खटला सुरु होता. हा खटला नंतर उच्च न्यायलयात सुनावणीसाठी वर्ग करण्यात आला. जागेचा मालक हा रेस्टॉरंट मालकाकडून अधिक भाड्याची मागणी करत असल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकाने केला होता. बाजार भावानुसार शिमल्यामधील या जागेचे भाडे दर महिन्याला दीड लाख रुपये इतके आहे. मात्र जागेचे मालक रेस्टॉरंट मालकाकडून 25 लाख रुपयांची मागणी करत होता. यावरुनच हा वाद न्यायलयात गेला आणि न्यायालयाने हा वाद मिटवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 10 जुलै हा रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्यासाठी न्यायालयाकडून देण्यात आलेला शेवटचा दिवस होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT