Karnataka leaders Against  Ajay Devgn | National Language Controversy
Karnataka leaders Against Ajay Devgn | National Language Controversy Against Karnataka leader Ajay Devgn
देश

कर्नाटकचे नेते अजय देवगणविरुद्ध एकवटले; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

कन्नड अभिनेता किच्चा सुदीप (kiccha sudeep) आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) यांच्यात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाला ट्विटरवर राजकीय वळण लागले आहे. विशेषत: कर्नाटकच्या राजकारणात अजय देवगणचे ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. सर्व पक्षांचे नेते कन्नड अस्मितेच्या नावाखाली एकवटलेले दिसताहेत. ‘आपली राज्ये भाषेच्या आधारावर निर्माण झाली आहेत. प्रादेशिक भाषांना महत्त्व दिले गेले. सुदीप यांचे म्हणणे खरे आहे. सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे’ असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यानंतर त्यांची ही टीका आली. (National Language Controversy)

मला कन्नडिगा असल्याचा अभिमान आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले होते. हिंदी ही राष्ट्रभाषा कधीच नव्हती आणि होणारही नाही. देशातील प्रत्येकाने भाषिक विविधतेला चालना देण्यासाठी काम केले पाहिजे. प्रत्येक भाषेचा स्वतःचा समृद्ध इतिहास असतो आणि ती बोलणाऱ्या लोकांना अभिमान वाटतो, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

देशात १९,५०० बोलीभाषा आहेत. ज्या लोकांच्या मातृभाषा आहेत. आपले भारतावरील प्रेम प्रत्येक भाषेतून व्यक्त होते. एक अभिमानास्पद कन्नडिगा आणि काँग्रेसवासी असल्याने मी सर्वांना सांगू इच्छितो की, आमच्या पक्षाने भाषिक आधारावर राज्यांची स्थापना केली आहे. जेणेकरून एका भाषेचे दुसऱ्या भाषेवर प्रभुत्व होऊ नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार म्हणाले.

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हे अभिनेता किच्चा सुदीपचे म्हणणे योग्य आहे. त्यांच्या विधानात काहीही चुकीचे नाही. अभिनेता अजय देवगण हा आक्रमक स्वभावाचा आहे. त्याने विचित्र वागणुकीचे प्रदर्शन केले आहे. हिंदी ही देखील कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी सारख्या भाषांसारखी भाषा आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. हा देश विविध संस्कृतींनी समृद्ध आहे. त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका, असे जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते कुमारस्वामी म्हणाले.

केवळ मोठी लोकसंख्या हिंदी बोलत असल्याने तिला राष्ट्रभाषा म्हणता येणार नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नऊपेक्षा कमी राज्यांमध्ये हिंदी ही दुसरी किंवा तिसरी भाषा आहे किंवा अशी राज्ये आहेत जिथे तिला स्थानही मिळालेले नाही. जर ही परिस्थिती असेल तर अजय देवगणच्या विधानात तथ्य काय आहे? अजय देवगणने हे विसरू नये की त्याचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ बंगळुरूमध्ये वर्षभर चालला, असेही कुमारस्वामी म्हणाले.

काय आहे वाद?

किच्चा सुदीपने (kiccha sudeep) केजीएफ-२ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट म्हणून घोषित केल्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना टिप्पणी केली होती. यावरून वाद निर्माण झाला होता. हिंदी ही राष्ट्रभाषा राहिली नसल्याचा दावा त्यांनी केला. बॉलिवूडला पॅन इंडिया सिनेमा म्हणायचे असेल तर इतर भाषांमध्येही चित्रपट डब केले पाहिजेत, असे सुदीप म्हणाला होता. यावर अजय देवगण (Ajay Devgn) म्हणाला होता की, जर हिंदी राष्ट्रभाषा नाही तर कन्नड चित्रपट हिंदीत का डब केले जात आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन।

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT