indian army sakal
देश

सैन्य दलात जवानांची तीन लाखांपर्यंत संख्या होणार कमी, अग्निपथ योजनेचं काय?

भारतीय सैन्य दलामधील जवानांची संख्या होणार कमी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात अग्निपथ योजनेवरुन वाद सुरु झाला आहे. बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तरुणांकडून या योजनेचा विरोध करित आहे. मात्र भारत सरकारने 'अग्निपथ योजना' (Agnipath Scheme) आणण्यापूर्वी काही वर्षांचे नियोजन केले आहे. तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आले असून एक रोडमॅप तयार केले गेले आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सरकार निवृत्ती वेतन करु इच्छित नाही. मात्र येणाऱ्या काळात सैन्य दलांमध्ये जवानांची संख्या कमी करण्यावरही जोर आहे. सध्याच्या सैन्यात जवानांची संख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. मात्र हा आकडा आता आगामी वर्षांमध्ये ११ लाखांपर्यंत आणण्याचे प्रयत्न केले जाईल.

या विषयी एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, की आगामी दहा वर्षांत एका निश्चित केलेल्या प्रकियेनुसार ते केले जाईल. जर देशातील सैन्य दलाला आधुनिक बनवायचे असेल, तर तंत्रज्ञानात प्रगत व्हायचे असेल तर अशा स्थितीत मॅनपाॅवर इंटेनसिव्ह बनवू शकत नाही. अनुमानानुसार आजपासून १० ते १५ वर्षानंतर भारतीय सैन्यामध्ये (Indian Army) जवानांची संख्या १० ते १०.५ लाखांवर पोहोचेल आणि पुन्हा काही वर्षांपर्यंत या भोवतीच हा आकडा ठेवला जाईल. विशेष बाब ही असेल की अग्निपथमुळे चार वर्षांच्या आत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त जवान सैन्य सोडून जातील, अशा स्थितीत दीर्घकाळात पेन्शनचा बोझाही कमी होत जाईल. हेच मुद्दे ध्यानात घेऊन सरकारने ही अग्निपथ योजना आणली आहे.

सध्याच्या सरकार समोर सर्वात मोठे आव्हान हे की संरक्षण अर्थसंकल्प वाढवून सुद्धा सैन्याजवळ नवीन आणि शक्तीशाली शस्त्रास्त्रे कमी असतात. कारण आताही संरक्षण अर्थसंकल्पाचा मोठा हिस्सा पेन्शन देण्यावर खर्च करावा लागत आहे. आकडे हे चित्र समोर आणतात. वर्ष २०२२ मध्ये संरक्षण अर्थसंकल्पासाठी ५, २५,१६६.१५ कोटी रुपये दिले गेले होते. मात्र यात नवीन शस्त्रास्त्रे खरेदीसाठी फक्त १,५२,३६९.६१ कोटी रुपये वाचले आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून आणखी एका गोष्टी सरकार काम करत आहे. आता या वेळी सैन्यात जवानांमध्ये सरासरी वय जास्त आहे. काळासह हे कमी करण्यासाठी एक आव्हान म्हणून पाहिले जात आहे. सरकारला वाटते, की अग्निपथ योजना या दिशेने यशस्वी होऊ शकते. म्हटले जात आहे, की येणाऱ्या वर्षांमध्ये सरासरी वय ३० वर्षांपेक्षा कमी करुन २५ वर्षापर्यंत जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT