car burnt 1.jpg 
देश

आम्हाला वाचवा...आम्हाला वाचवा...पेटत्या कारमध्ये 5 जणांनी सोडले प्राण

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- यमुना एक्स्प्रेस वेवर आज (मंगळवार) पहाटे भीषण अपघात झाला. चुकीच्या दिशेने येत असलेल्या टँकरने दिलेल्या धडकेत कारने पेट घेतला आणि आतील प्रवासी अक्षरश: जिवंत जळाले. हे प्रवासी आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा अशी आर्त हाक देत होते. परंतु, आग इतकी पसरली होती की त्यांना वाचवणेही शक्य नव्हते. मदतीला स्थानिक लोक असतानाही त्यांना मदत करता आली नाही. 

यमुना एक्स्प्रेस वेवर मंगळवारी पहाटे चुकीच्या दिशेने येत असलेल्या टँकरने कारला समोरुन धडक दिली. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. यामध्ये लहान मुलेही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धडक बसल्यानंतर काही क्षणांत कारने पेट घेतला. आग इतकी भयानक होती की आतील लोकांना बाहेरच निघता आले नाही. पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अपघातग्रस्त कार आमच्या मागे होती. अपघाताच्या काही क्षण आधीच या कारने आम्हाला ओव्हरटेक केले होते. ज्या टँकरने धडक दिली, ती चुकीच्या दिशेने येत होती. त्या टँकरचा डिझेल टँकही लीक झाला होता. या दुर्देवी घटनेनंतर आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कारला आग लागल्यानंतर आत अडकून बसलेल्या मुलांना काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पेटलेल्या कारमधील तीन ते चार जण आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, अशी हाक देत होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT