Ahmedabad Migrant workers pelts stones at police public cops lob teargas shells 
देश

परप्रांतिय कामगारांचा उद्रेक; पोलिसांवर दगडफेक

वृत्तसंस्था

अहमदाबाद : गेल्या काही दिवासांपासून दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांना घरी जाण्यासाठी केंद्राने रेल्वे विभागामार्फत श्रमिक एक्सप्रेस गाड्यांची सोय केली आहे. मात्र, देशाच्या काही भागांत अजुनही मजूर व कामगार अडकून पडले आहेत. गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचा उद्रेक झाल्याचे आज (ता. १८) पाहायला मिळाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अहमदाबादमध्ये घरी जाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या १०० परप्रांतीय कामगारांनी पोलिस आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांवर दगडफेक केली आहे. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जमखी झाले असून जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्जचा वापर करावा लागला.

रस्त्यावर आलेल्या मजुरांना ज्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांवरच दगडफेक केली. वस्त्रापूर भागात दोन पोलिसांच्या गाड्या, एक खासगी कार्यालय, आणि कन्स्ट्रक्शन साईटची कामगारांनी नासधूस केली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. 
------
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत काशी विश्वनाथ मंदिराचा मोठा निर्णय
------
पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले आहेत तरी कोण?
------
लॉकडॉऊन 4:0 च्या गाईडलाईन जाहीर; काय चालू, काय बंद?
-------
धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिकाचे कोरोनामुळे निधन
-------
पोलिसांनी याप्रकरणात कामगारांना ताब्यात घेतलं असून सर्वांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अहमदाबाद शहरातली करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, आतापर्यंत ८ हजार ४२० रुग्ण सापडले आहेत. तर ५२४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरात सरकार व पोलिसांना परप्रांतीय कामगारांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. याआधीही सूरत, वडोदरा शहरात कामगारांनी पोलिसांवर हल्ला व दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT