aimim asaduddin owaisi on rss mohan bhagwat statement over gyanvapi mosque row
aimim asaduddin owaisi on rss mohan bhagwat statement over gyanvapi mosque row  
देश

मोहन भागवत यांच्या विधानावर ओवैसींचे प्रत्युत्तर, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या महत्त्वपूर्ण वक्तव्याला एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी संघाचा जुनी सवय असल्याचे म्हटले आहे. यावर ओवैसी यांनी 17 मुद्यांचे निवेदन जारी करून प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. (aimim asaduddin owaisi on rss mohan bhagwat statement over gyanvapi mosque row )

ज्ञानवापी प्रकरण हे श्रध्देचा विषय असून न्यायालयाच्या निर्णयाचा सगळ्यांनी आदर करावा, प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची तसेच दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही असे सरसंघचालक भागवत यांनी यापूर्वी म्हटले होते. वाद दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे सोडवावा, अन्यथा न्यायालयाचा निर्णय मान्य करावा, असेही ते म्हणाले होते.

संघप्रमुखांच्या वक्तव्यावर ओवैसींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मोहन भागवत यांच्याऐवजी पंतप्रधान मोदींनी स्पष्ट विधान करावे. एआयएमआयएम नेत्याने सांगितले की, जर पंतप्रधान मोदींनी भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले तर त्यांना सर्व हिंदुत्ववादी नेत्यांना थांबवावे लागेल.

ओवैसी म्हणाले की, संघप्रमुखांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करू नये. काही गोष्टी लोकप्रिय नसल्या की त्यापासून दूर राहणे ही संघाची जुनी रणनीती आहे. शुक्रवारी ओवैसी यांनी ट्विटरवर 17 मुद्दे मांडत एक दीर्घ पोस्ट लिहिली. त्यात एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, बाबरी आंदोलनाच्या वेळीही संघाच्या नेत्यांचा एक भाग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू असे म्हणत होता. ओवैसी म्हणाले की, मोहन भागवत आणि जेपी नड्डा यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी 1991 च्या धर्मस्थळ कायद्यासोबत असल्याचा स्पष्ट संदेश द्यायला हवा.

ओवैसी यांनी विहिंपच्या स्थापनेपूर्वी अयोध्याचा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर नव्हता, असा दावा केला. 1989 मध्ये भाजपच्या पालनपूर अधिवेशनात हाच अजेंडा ठरला. आरएसएस राजकीयदृष्ट्या दुतोंडी भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, काशी, मथुरा, कुतुबमिनार हे सर्व मुद्दे मांडणारे जोकर आहेत. ते थेट संघाशी संबंधित आहेत.

काँग्रेस काय म्हणाली?

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, त्यांचे विधान अतिशय विधायक आहे. आपण इतिहास बाजूला ठेवला पाहिजे. त्याचा एकमेकांविरुद्ध युद्धाचे शस्त्र म्हणून वापर करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT