air india london mumbai flight passengers smoking cigarette also tried to open the emergency door
air india london mumbai flight passengers smoking cigarette also tried to open the emergency door 
देश

Air India Flight : विमानात प्रवाशांचा अचरटपणा थांबेना! टॉयलेटमध्ये सिगारेट ओढताना सापडला, अखेर हात-पाय बांधून...

सकाळ डिजिटल टीम

एअर इंडियाच्या पी गेट प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लंडनहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका ३७ वर्षीय व्यक्ती फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये सिगारेट ओढताना पकडला गेला आबे. सहार पोलिसांनी आरोपी रत्नाकर करुकांत द्विवेदीविरुद्ध भादंवि कलम ३३६ आणि एअरक्राफ्ट अॅक्ट १९३७ च्या कलम २२, २३ आणि २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

एवढेच नाही तर करुणकांत याच्यावर आरोप आहे की त्याने सर्व क्रू मेंबर्सवर ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला कसेतरी पकडून सीटवर बसवले. यानंतरही नकार दिल्यावर तो फ्लाइटच्या दरवाजाजवळ गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. यामुळे सर्व प्रवासी घाबरले, पण तो शांत होण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळेच अखेर त्याला हातपाय बांधून सीटवर बसण्यास भाग पाडण्यात आले.

पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी सांगितले की, आरोपी येथेही थांबला नाही आणि स्वतःचं डोकं आपटायला लागला. मग विमानातील लोक फ्लाइटमध्ये डॉक्टर शोधू लागले. तेवढ्यात एक व्यक्ती आला, त्याने या व्यक्तीला तपासले आणि आरोपीने बॅगेतून गोळी काढून त्याला देण्यास सांगितले. मात्र, त्याच्या बॅगेत कोणतेही औषध सापडले नाही, फक्त सिगारेटचा बॉक्स सापडला. विमान उतरताच या आरोपीला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वैद्यकीय चाचणीसाठी नमुने पाठवले

पोलिसांनी सांगितले की, आरोपी भारतीय वंशाचा आहे, परंतु तो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा नागरिक आहे आणि त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. आरोपीचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले असून, याचा रिपोर्ट आल्यानंतरच तो व्यक्ती नशेत होता की मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, हे समजू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT