Air India Sakal
देश

Ukraine : भारतीय विद्यार्थ्यांसाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय

एअर इंडियाकडून युक्रेनसाठी तीन उड्डणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

एअर इंडियाकडून युक्रेनसाठी तीन उड्डणे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील तणावपूर्ण वातावरणात एअर इंडियाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. एअर इंडियाने भारत युक्रेनदरम्यान तीन उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे युक्रेनमध्ये संकटात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही काहीशी दिलासादायक बातमी आहे. याबाबत एअर इंडियाने शुक्रवारी ट्वीट केले आहे. (Air India Announced Flights For Ukraine)

एअर इंडियातर्फे तीन उड्डाणांची घोषणा

युक्रेनसाठी सुरू करण्यात उड्डाणांबाबत एअर इंडियाने तारखांची देखील माहिती दिली असून, भारत-युक्रेनदरम्यान, 22, 24 आणि 26 फेब्रुवारी रोजी उड्डाणे चालवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एअर इंडियाची कार्यालये, वेबसाइट, कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सद्वारे या फ्लाइट्सचे बुकिंग आतापासून सुरू झाल्याचेही ट्वीटमध्ये नमुद करण्यात आले आहे. (Russia-Ukraine Crises Latest News In Marathi )

युक्रेनमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी

सरकारी आकडेवारीनुसार युक्रेनमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत (Indian Student In Ukraine) आहेत. त्यात सध्या रशियासोबत सुरू असलेल्या तणावामुळे भारत सरकार विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स, एअर अरेबिया, फ्लाय दुबई आणि कतार एअरवेज सध्या युक्रेनमधून उड्डाणे चालवत असून, अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी आगामी काळात आणखी उड्डाणांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे मंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : प्रभाग 59 मध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिवेकर यांना मुंबई डबेवाला संघटनेचा पाठिंबा

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT