Air Pollution In India esakal
देश

हवा प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान घटले, मानवी आरोग्यासाठी धोका

हवा प्रदूषण हे देशात मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हवा प्रदूषण (Air Pollution) हे देशात मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे जवळपास ५ वर्षांनी आयुर्मान घटत चालले आहे. जर वार्षिक सरासरी प्रदूषणाचा स्तर पाच मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरपेक्षा अधिक नसेल तर सर्वात प्रदूषित राज्य दिल्लीत (Delhi) हे आयुर्मान १० वर्षानी कमी होऊ शकते. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा नीती संस्थेच्या (ईपीआयसी) हवा गुणवत्ता जीवन सुचकांक (एक्यूएलआय) मंगळवारी जारी करण्यात आला. मातृत्व कुपोषणामुळे सरासरी वय १.८ वर्ष आणि धूम्रपानामुळे १.५ वर्षाने कमी होते. (Air Pollution Reduce Life Expectancy In India Study Reveal glp88)

आजारपणाचे ओझे कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १० मायक्रोग्रॅम प्रति मीटरचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षी एक्यूएलआयच्या विश्लेषणानुसार दिल्ली सर्वात प्रदूषित राज्य होते. या वर्षाच्या विश्लेषणानुसार उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि त्रिपुरा ही पहिल्या पाच प्रदूषित राज्यांमध्ये सामील आहेत. येथे प्रदूषणाचा स्तर अधिक असल्याने लोकांच्या आयुर्मानात मोठी घट झाली आहे.

बांगलादेशनंतर भारत हा दुसरा सर्वाधिक प्रदूषित देश

जागतिकस्तरावर भारत बांगलादेशनंतर दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे. बांगलादेशमध्ये खराब हवेमुळे २०२० मध्ये आयुर्मान ६.९ वर्षांनी घटले आहे. त्यानंतर नेपाळ (४.१ वर्ष), पाकिस्तान (३.८) आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो (२.९) या देशांचा क्रमांक लागतो. एक्यूएलआयला आढळले की हवा प्रदुषणामुळे जगभरात सरासरी आयुर्मानात २.२ वर्षांनी घट झाली आहे. अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे आयुर्मान दारु पिणे आणि दुषित पाणी पिल्याने तीन पटीने अधिक, एचआयव्हीच्या तुलनेत सहा पट अधिक आणि दहशतवादी घटनांनी ८९ पट अधिक होते.

जागतिक आणीबाणीसारखी आताची स्थिती

प्राध्यापक मायकल ग्रीनस्टोन म्हणाले, जर मार्टियन्स पृथ्वीवर आले आणि एक पदार्थ शिंपडले, तर त्याने ग्रहावर व्यक्तीचे सरासरी आयुर्मान दोन वर्षांपेक्षा अधिक कमी होईल. या स्थितीला जागतिक आणीबाणी म्हटले जाईल. आताची स्थितीही त्या प्रमाणे असून जगातील अनेक भागांमध्ये ती पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT