akhilesh yadav said police may give poison to me in tea video goes viral  
देश

"चहा पिऊ शकत नाही, तुम्ही विष…"; अखिलेश यादवांचा पोलिस मुख्यालयातील Video Viral

सकाळ डिजिटल टीम

समाजवादी पार्टीचे ट्विटर हँडल संचालक मनीष जगन अग्रवाल यांना अटक केल्यानंतर अखिलेश यादव पोलिस मुख्यालयात पोहोचले. त्यांना येताना पाहून अनेक पोलीस अधिकार समोर आले आणि त्यांच्यासाठी चहा मागवू लागले. यावर अखिलेश यादव यांनी पोलिस मुख्यालयातील चहा पिण्यास नकार दिल्याचं दिसून आलं.

सकाळी एका समन्वयकाच्या अटकेलनंतर पोलिस मुख्यालयात पोहचलेल्या सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांना कोणताही पोलिस अधिकारी भेटले नाहीत. मुख्यालयात एकही पोलिस अधिकारी उपस्थित नव्हता.नंतर त्यांना पोलिस अधिकाऱ्यांकडून चहा पिण्याचे निमंत्रण देण्यात आले. याला अखिलेश यादव यांनी नकार दिला. दरम्यान अखिलेश यादव आणि पोलिसांच्या चर्चेतील हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

अखिलेश यादव काय म्हणाले

रविवारी सकाळी अखिलेश यादव लखनऊ येथील पोलीस मुख्यालयात पोहचले होते, यावेळी पोलिस अधिकाऱ्यांकडून चहाची विचारणा करण्यात आली, त्यालवर त्यांनी पोलिसांना सांगितले की , “तुम्ही नका, आम्ही बाहेरून मागवत आहोत. आम्ही येथील चहा नाही पिणार. आम्ही बाहेरून चहा आणू, तुमच्याकडून फक्त प्लास्टीकचे कप घेऊ. चहात विष टाकून दिलं तर. तुमच्यावर माझा बिल्कूल विश्वास नाही. तुम्ही तुमचा चहा प्या, आम्ही आमचा पितो”

नेमकं झालं काय होत?

लखनऊ येथील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये मनीष जगन अग्रवाल यांना रविवारी सकाळी अटक करण्यात आले. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलमवून वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

लखनऊ बीजेपी युवा मोर्चाच्या सोशल मीडिया इंचार्ज ऋचा राजपूत यांनी समाजवादी पार्टी मीडिया सेल नावाच्या ट्विटर हँडलवर रेप आणि हत्येची धमकी दिल्याबद्दल ६ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. मनीष जगन यांच्या विरोधात एफआयआरमध्ये समन्वयक आशीष यादव आणि माजी आमदार उदयवीर सिंह यांचे देखील नाव होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT