Sonia Gandhi Retirement Alka Lamba esakal
देश

Politics News : सोनिया गांधी राजकारणातून संन्यास घेणार? काँग्रेस प्रवक्त्या म्हणाल्या, मला आनंद होत आहे की..

सोनिया गांधींनी 1998 ला काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यापासून ते आतापर्यंतचा आपला राजकीय प्रवास उलगडला.

सकाळ डिजिटल टीम

भारत जोडो यात्रा सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून त्याच्यासह माझी इनिंग संपत आहे याचा मला फार आनंद आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

Sonia Gandhi Retirement : छत्तीसगडच्या रायपूर (Raipur) इथं सुरु असलेल्या काँग्रेस (Congress) अधिवेशनात पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भावूक भाषण केलं.

सोनिया गांधींनी 1998 ला काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यापासून ते आतापर्यंतचा आपला राजकीय प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचंही आभार मानलं. मात्र, सोनिया गांधींनी यावेळी केलेल्या भाषणामुळं त्या सक्रीय राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चर्चा रंगलीये.

दरम्यान, पक्षाच्या प्रवक्त्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी सोनिया गांधींच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलंय. रायपूरच्या अधिवेशनात बोलताना लांबा म्हणाल्या, 'मला सोनिया गांधींसोबत 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी त्यांना म्हणाले, मॅडम.. तुमच्या कालच्या भाषणातून तुम्ही राजकारणातून निवृत्ती घेताय असं समजतं. परंतु, मला सांगायला आनंद होत आहे की, सोनियाजींनी भविष्यातही आम्हाला त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं सोनिया गांधी राजकारणातून इतक्यात निवृत्त होणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सोनिया गांधींनी आपल्या भाषणात सांगितलं की, 1998 मध्ये काँग्रेस अध्यक्षपद घेतल्यापासून ते आतापर्यंतच्या 25 वर्षात आपण अनेक गोष्टी मिळवल्या असून, काही निराशाजनक गोष्टीही झाल्या. सोनिया गांधींनी यावेळी 2004 आणि 2009 लोकसभा निवडणुकीत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मिळालेला विजय हे पक्षाचं सर्वात मोठं यश होतं, असं सांगितलं. भारत जोडो यात्रा सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून त्याच्यासह माझी इनिंग संपत आहे याचा मला फार आनंद आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यामुळं त्या राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चर्चा रंगली होती. आता यावर प्रवक्त्या अलका लांबा यांनी स्पष्टीकरण दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT